प्रत्येक व्यक्ती आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे, यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. वयाच्या ६० वर्षानंतर नियमित पैसे मिळावे, यासाठी एफडी, बँकेच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. यासाठीच सरकारने एक योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना वयाच्या ६० वर्षानंतर नियमित पेन्शन मिळते.
अटल पेन्शन योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्याने तुम्हाला उतारवयात पैशाची गरज भासणार नाही. या योजनेत तुम्हाला कर सूटदेखील मिळते.
अटल पेन्शन योजनेअंतर्गत नागरिकांना प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करायची आहे. १८ ते ४० वयोगटातील नागरिक या योजनेत अटल पेन्शन योजना खाते उघडू शकतात. या योजनेत तुम्हाला महिन्याला १०००, २००० ते ५००० रुपये मासिक पेन्शन मिळवण्याचा पर्याय दिला जातो.
या योजनेत तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर जेवढी पेन्शन हवी आहे त्यानुसार गुंतवणूक करायची आहे. जर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर १००० रुपयांची मासिक पेन्शन मिळवायची असेल तर ४२ रुपये महिन्याला गुंतवावे लागतात. २००० रुपयांची पेन्शन मिळवायची असेल तर ८४ रुपये महिन्याला गुंतवणूक करावी लागेल.३००० रुपयांची पेन्शन मिळवायची असेल तर १२६ रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्हाला ४००० रुपयांची पेन्शन मिळवायची असेल तर १६८ रुपये प्रत्येक महिन्याला गुंतवावे लागतील. जर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर ५००० रुपयांची पेन्शन मिळवायची असेल तर २१० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
या योजनेत तुम्ही कमीत कमी वयात गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे.त्यामुळे १८ वर्षांपासून गुंतवणूक करणे हे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.
अर्ज कसा कराल?
या योजनेसाठी तुम्ही बँकेत ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने खाते उघडू शकतात. यात तुम्ही तुमच्या सोयीनुसार पैसे गुंतवू शकतात. या योजनेसाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खाते नंबर आवश्यक आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.