Bharat Jadhav
आयकर रिटर्न भरल्यानंतर आपल्याला रिफन्ड मिळतो. आता अनेकांना रिफंड कधी येणार या चर्चा सुरू आहे.
आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि वर्ष २०२४-२५ साठी दंड न भरता आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२४ रोजी संपली.
आयकर विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, ३१ जुलैपर्यंत देशभरातील ७.२८ कोटी करदात्यांनी आयकर रिटर्न भरले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत ७.५ टक्के वाढ दिसून आली आहे. २०२३-२४ च्या मूल्यांकन वर्षात ३१ जुलैपर्यंत एकूण ६.७७ कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते.
अनेक करदाते आहेत जे एका वर्षात जास्त कर जमा करतात, नंतर त्यांना आयकर परतावा दिला जातो. पण अनेकांना तो परतावा किती दिवसांनी परत मिळतो याची माहिती नाहीये.
करदात्यांनी जर आयटी रिटर्न भरल्याच्या ४ ते ५ आठवड्याच्या आत रिफंड जमा होईल.
जर तुम्हाला आयकर परतावा मिळाला नसेल, तर तुम्ही आयकर ई-फायलिंग पोर्टलला भेट देऊन संबंधित माहिती मिळवू शकता.
आयकर विभाग तुम्हाला ई-मेल आणि मेसेजद्वारेही माहिती देईल.
येथे क्लिक करा