ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात आपल्याकडील इलेक्ट्रॉनिक उपकरणांची जास्त काळजी घ्यावी लागते.
कायम लक्षात ठेवा की कोणतेही इलेक्ट्रॉनिक वस्तू बाहेर घेऊन गेल्यानंतर पाण्याच्या संपर्कात येणार नाही.
पावसाळ्यात तुमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूची वायरिंग तपासून घ्यावी.
जर पावसाळ्यात चार्जर ओले असल्यास ते वापरणे टाळावे.
पावसाळ्यात घरातील पावर सप्लाईची दुरुस्ती करुन घ्यावी.
इलेक्ट्रॉनिक उपकरण हाताळताना कधीही ओले हात वापरु नये.
पावसाळ्यापूर्वी तुमच्याजवळील इलेक्ट्रॉनिक उपकरण साफ करुन घेणे.