Atal Pension Yojana  Canva
बिझनेस

Atal Pension Scheme: जबरदस्त योजना! दररोज फक्त ७ रुपये गुंतवा अन् महिन्याला ५००० रुपयांची पेन्शन मिळवा

Atal Pension Scheme: अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला गँरटेड परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला दररोज फक्त ७ रुपयांची गुंतवणूक करायची आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर नागरिकांना भविष्यात आर्थिक अडचण येणार नाही. अशीच एक योजना म्हणजे अटल पेन्शन योजना. योजनेच्या नावाप्रमाणेच गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळणार आहे. या योजनेत तुम्ही सुरक्षित गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळतो.

अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन मिळणार आहे. या योजनेत आतापर्यंत ७ कोटी नागरिकांनी लाभ घेतला आहे. (Atal Pension Yojana)

अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात अडचण येणार नाही. तुम्हाला गॅरंटी पेन्शन मिळणार आहे. या योजनेत तुम्ही रोज ७ रुपये गुंतवून हजारो रुपयांची पेन्शन दर महिन्याला मिळवू शकतात.या योजनेत १८ ते ४० वयोगटातील नागरिक अर्ज करु शकतात.

अटल पेन्शन योजनेत कमीत कमी २० वर्षे गुंतवणूक करणे गरजेचे आहे. जर तुम्ही ४० वर्षांचे आहात तर तुम्ही आता गुंतवणूक केली तर २० वर्षांनी दर महिन्याला पेन्शन मिळणार आहे.

जर तुम्ही १८ वर्षांचे असाल आणि रोज फक्त ७ लाख रुपये गुंतवले म्हणजेच महिन्याला २१० रुपये जमा करणार आहे.या योजनेत जेव्हा तुम्ही ६० वर्षांचे व्हाल तेव्हा तुम्हाला दर महिन्याला ५००० रुपयांची पेन्शन मिळणार आहे. जर तुम्हाला दर महिन्याला १००० रुपयांची पेन्शन हवी असेल तर दर महिन्याला फक्त ४२ रुपये जमा करायचे आहेत.

अटल पेन्शन योजनेत पती-पत्नी दोघे मिळून १० हजार रुपयांची पेन्शन मिळवू शकतात.जर पतीचा मृत्यू झाला तर पत्नीला हे पैसे मिळणार आहेत. दरम्यान, दोघांचाही मृत्यू झाला तर सर्व पैसे नॉमिनीला मिळणार आहेत. (Atal Pension News)

अटल पेन्शन योजना २०१५-१६ ला सुरु झाली होती. दरवर्षी लाखो नागरिक या योजनेच नव्याने जोडले जातात. ७ कोटी नागरिकांनी या योजनेत आधीच गुंतवणूक केली आहे. या योजनेत तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत सूट मिळते. तुम्हाला १.५ लाखांच्या गुंतवणूकीवर टॅक्स वाचवता येणार आहे. या योजनेत अर्ज करणारा व्यक्ती भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT