APY SCHEME GOGGLE
बिझनेस

APY Scheme: केंद्र सरकारची जबरदस्त योजना! दररोज ७ रुपये गुंतवा अन् महिन्याला ५००० रुपयांची पेन्शन मिळवा

Atal Pension Scheme: केंद्र सरकारने नागरिकांसाठी अटल पेन्शन योजना सुरु केली आहे. या योजनेत तुम्हाला फक्त ७ रुपयांची गुंतवणूक करुन दर महिन्याला ५००० रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. या गुंतवणूकीमुळे तुम्हाला भविष्यात कधीच पैशांची चणचण भासणार नाही. तुम्ही नेहमी सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा. सरकारी योजनांमध्ये तुम्हाला सुरक्षित परतावा मिळतो. कमीत कमी गुंतवणूकीत चांगला परतावा दिला जातो. यासाठीच केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) सुरु केली आहे.

अटल पेन्शन योजनेत तुम्हाला कमीत कमी गुंतवणूक करायची असते. या योजनेत तुम्हाला जबरदस्त रिटर्न मिळणार आहे. अटल पेन्शन योजनेत तुम्ही १००० ते ५००० रुपयांची पेन्शन मिळवू शकतात. या योजनेत तुम्ही जेवढी गुंतवणूक करता त्यावर तुमच्या पेन्शनची रक्कम अवलंबून असते. या योजनेत तुम्हाला गॅरंटीड पेन्शन मिळते.

अटल पेन्शन योजनेत १८ ते ४० वयोगटातील नागरिक अर्ज करु शकतात. या योजनेत तुम्हाला वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन मिळते.

या योजनेत तुम्हाला कमीत कमी २० वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. जर तुम्ही ४० वर्षांचे असाल तर आतापासून गुंतवणूक करायची आहे. या योजनेत जर तुम्ही १८ वर्षांपासून गुंतवणूक केली तर तुम्हाला ५००० रुपयांची महिन्याला पेन्शन मिळणार आहे. या योजनेत तुम्ही रोज फक्त ७ रुपयांची गुंतवणूक करायची आहे.त्यानंतर तुम्हाला ५००० रुपये मिळणार आहेत. जर तुम्हाला महिन्याला १००० रुपयांची पेन्शन हवी असेल तर महिन्याला ४२ रुपये गुंतवावे लागणार आहे.

अटल पेन्शन योजनेत पती पत्नी दोन्ही मिळून १० हजार रुपये मिळवू शकतात. या योजनेत पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला पेन्शन मिळणार आहे.

अटल पेन्शन योजनेत फक्त पेन्शन नाही तर इतर अनेक सुविधा मिळतात. या योजनेत तुम्हाला १.५ लाखांपर्यंत टॅक्स वाचवता येणार आहे. आयकर कलम 80C अंतर्गत टॅक्समधून सूट मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aloo Chaat Recipe: संध्याकाळी नाश्त्याला खा चटपटीत आलू चाट, बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी

Maharashtra Live News Update: नाशिकच्या तपोवन परिसरात प्रस्तावित असलेले MICE सेंटरची निविदा अखेर रद्द

Types of Bridal Makeup: यंदा कर्तव्य आहे? मग जाणून घ्या कोण-कोणत्या प्रकारचे असतात ब्राइडल मेकअप

रहमान डकैतच्या एनकाऊंटरनंतर ल्यारीमध्ये नेमकं काय घडलं?

Aloe Vera Benefits For Skin: हिवाळ्यात चेहऱ्याला कोरफड लावण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT