AI In Farming Google
बिझनेस

Artificial Intelligence: कृषी क्षेत्रातही AI चा वापर! शेतकऱ्यांचं काम होणार सोपं अन् उत्पन्न वाढणार

Artificial Intelligence In Farming: आर्टिफिशियल इंटेलिजन्स हळूहळू प्रत्येक क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करतंय. शेती क्षेत्रातही आता एआयचा वापर केला जात आहे. राज्यातील बारामती येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने पिके घेण्यात आली आहेत. हे तंत्रज्ञान कसं काम करतं, ते पाहू या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Artificial Intelligence In Farming Baramati

आजच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सर्वत्र चर्चा होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा एआय संदर्भात प्रत्येक क्षेत्रात विविध प्रकारचे प्रयोग केले जात आहेत. या संदर्भात कृषी क्षेत्रातही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्रातील बारामती जिल्ह्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाने पिके घेतली गेली (Artificial Intelligence In Farming) आहेत. बारामतीत पहिल्यांदाच शेतीत केलेला हा प्रयोग यशस्वीही झाल्याची माहिती मिळतेय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पिकाचे नियोजन

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (Artificial Intelligence In Farming) मदतीने उसाबरोबरच भेंडी, टोमॅटो, मिरची, टरबूज, भोपळा, फुले, कोबी ही पिके बारामती जिल्ह्यात घेण्यात आली आहेत. यामध्ये प्रत्येक पिकाचे नियोजन आर्टिफिशियल इंटेलिजन्सने केलं जातं. पीक व्यवस्थापन कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारेच केलं जात आहे.

एआयने शेतीमध्ये कशी भूमिका बजावली

याबाबत कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ तुषार जाधव म्हणाले की, विविध पिकांमध्ये प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे. यात विविध प्रकारचे सेन्सर आहेत, जे पिकांबद्दल जाणून घेण्यास मदत करतात. यामध्ये मातीचे नायट्रोजन, फॉस्फरस, फॉस्फरस, हवेचं तापमान आणि वाऱ्याचा वेग आणि हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी तसेच हवेतील रोगांचे सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी सेन्सर आहेत.

तंत्रज्ञान कसे कार्य करते

एआयमध्ये एक सेन्सर प्रणाली आहे. ती पाण्याचे मोजमाप करते, मातीची क्षारता तपासते. पिकांवर परिणाम करणाऱ्या जमिनीची विद्युत चालकता देखील तपासते. दर अर्ध्या तासाने ही यंत्रणा जमिनीवर, जमिनीच्या बाहेर आणि हवेत घडणाऱ्या सर्व घटनांची माहिती सेन्सरद्वारे उपग्रहाकडे आणि उपग्रहाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेचे सॉफ्टवेअर (Artificial Intelligence) असलेल्या संगणकावर पाठवते. त्यावरून एआय सिस्टीम संबंधित शेतकऱ्याला पुरेशी माहिती पुरवते.

या माहितीच्या मदतीने शेतकऱ्याला जमिनीला किती पाणी द्यावे, किती खत द्यावे, कोणत्या प्रकारची खते द्यायची याची माहिती मिळते. अशा प्रकारे एआय काम करते. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT