Success Story google
बिझनेस

Success Story: पुस्तकी किडा नव्हे; खेळ खेळून ठरला जेईई २०२५ मेनचा टॉपर, JEE उत्तीर्ण अर्णव सिंग याचा प्रेरणादायी प्रवास

Arnav Singh Success Story: १८ वर्षीय अर्णवने पहिल्याच प्रयत्नात जेईई मेन्स २०२५ उत्तीर्ण केली. बिहारमधील त्याचे कुटुंब सध्या कोट्यात राहते. त्याचे वडील आयआयटीमधून पदवीधर असून अ‍ॅलन इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक आहेत.

Dhanshri Shintre

अठरा वर्षीय अर्णव सिंगने पहिल्याच प्रयत्नात जेईई मेन २०२५ परीक्षा उत्तीर्ण करून उल्लेखनीय यश मिळवले. विशेष म्हणजे, त्याने बारावीच्या बोर्ड परीक्षेपूर्वीच ही प्रवेश परीक्षा पास केली आहे. आता तो एप्रिल सत्रातही परीक्षेला बसणार असून जेईई अ‍ॅडव्हान्स्ड २०२५ साठी तयारी करणार आहे. बिहारमध्ये मूळ असलेले त्याचे कुटुंब सध्या कोट्यात राहते. त्याचे वडील आयआयटी पासआउट असून, त्यांच्या मते अर्णवच्या यशाचे गुपित केवळ अभ्यासात नसून खेळातही आहे. अभ्यासासोबत खेळालाही महत्त्व देत अर्णवने हे यश मिळवले. जाणून घ्या, या प्रतिभावान विद्यार्थ्याच्या मेहनतीचा प्रवास आणि त्याच्या यशाचे खास रहस्य.

बिहारमध्ये मूळ असलेला अर्णव वडिलांच्या नोकरीनिमित्त कोटा, राजस्थानला आला. त्याचे वडील आयआयटी दिल्लीचे २००३ बॅचचे सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीधर असून, सध्या अ‍ॅलन कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक आहेत. कुटुंबाच्या शिक्षणपरंपरेतून अर्णवला अभियांत्रिकी करण्याची प्रेरणा मिळाली. त्याच्या यशाच्या प्रवासात घरच्या मार्गदर्शनाची मोठी भूमिका राहिली आहे.

अर्णवचे वडील अजित सिंग यांच्या मते, त्याचा मुलगा आयआयटी बॉम्बेमधून संगणक शास्त्रात पदवी घेण्याचे स्वप्न पाहतो. तयारीदरम्यान त्याने कठोर अभ्यासक्रमाच्या ऐवजी संकल्पना स्पष्ट करण्यावर भर दिला. अर्णवच्या अभ्यास पद्धतीनेच त्याला यश मिळवून दिले असे त्यांच्या वडिलांचे मत आहे.

अर्णवच्या वडिलांनी सांगितले की, परीक्षेच्या आदल्या दिवशी तो आपल्या धाकट्या भावासोबत अर्धा तास टेबल टेनिस खेळला. त्यांच्या मते या सवयीमुळे अर्णवला तणावमुक्त राहण्यास आणि परीक्षेत चांगली कामगिरी करण्यास मदत झाली. विशेष म्हणजे अर्णवने अभ्यासासाठी कठोर नियम कधीच आखले नाहीत. तो दहावीपर्यंत नियमित अभ्यासक्रमाचे पालन करत होता परंतु त्याचा मुख्य भर संकल्पना स्पष्ट करण्यावर होता. त्याच्या समजून घेण्याच्या दृष्टिकोनामुळेच त्याला यश मिळाले. अभ्यासासोबत खेळालाही महत्त्व देत त्याने आपली तयारी केली.

अर्णवने जेईई मेन २०२५ ची तयारी करताना केवळ अभ्यासावर भर दिला नाही, तर मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली. तो गुणांच्या शर्यतीत न अडकता शांत आणि संतुलित राहण्यावर लक्ष केंद्रित करत होता. आपल्या दिनचर्येत खेळाला महत्त्वाचा भाग बनवत, तो दररोज भावासोबत क्रिकेट खेळायचा. अर्णवच्या वडिलांच्या मते, खेळामुळेच तो अभ्यास चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकला आणि मानसिक तणाव टाळू शकला. अर्णव स्वतः मानतो की त्याच्या यशाचे प्रमुख कारण खेळ आहे, ज्यामुळे तो सतत प्रेरित आणि ताजातवाना राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT