अमूल कंपनीने आपल्या तब्बल ७०० उत्पादनांच्या किंमतींमध्ये कपात केली.
तुपाची किंमत ४० रुपयांनी कमी झाली.
चीज, पनीर, आइसक्रीम, बटर यांसारखी उत्पादने स्वस्त झाली.
नवे दर सोमवारपासून देशभरात लागू होणार आहेत.
List of Amul 700 products with new prices : अमूलने आपल्या तब्बल ७०० पेक्षा जास्त उत्पादनांच्या किंमतीमध्ये मोठी कपात केली आहे. केंद्र सरकारने जीएसटी कपातीचा निर्णय घेतल्यानंतर अनेक कंपन्यांकडून उत्पादनांच्या किंमती कमी केल्या आहेत. त्यामध्ये अमूल या कंपनीचाही समावेश झाला आहे. महाराष्ट्रासह देशभरात अमूलच्या विविध उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अमूलने ७०० प्रॉडक्ट्सचे दर कपात करत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. सोमवार, २२ सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार आहेत. यामध्ये तूप, चीज, आईस्क्रीम यासारख्या उत्पादनांचा समावेश आहे. शनिवारी रात्री गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड (GCMMF) कडून ७०० पेक्षा जास्त वस्तू स्वस्त केल्याचं जाहीर केले.
केंद्र सरकारने काही वस्तू १८ टक्के स्लॅबमधून थेट ५ टक्के स्लॅबमध्ये वळवल्या आहेत. त्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना झाला आहे. केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईननुसार, अमूलनेही आपल्या उत्पादनाच्या किंमतीत घट केली आहे. त्यानुसार, अमूलचे तूप, बटर आइस्क्रीम यासह ७०० हून अधिक उत्पादनांच्या पॅकची किरकोळ किंमत कमी झाली आहे. हे नवे दर सोमवारपासून लागू होणार आहेत. दरम्यान, याआधी मदर डेअरीकडूनही आपल्या उत्पादनात कपात करण्यात आली होती.
अमूलने तूप, UHT दूध, आइसक्रीम, चीज, पनीर, चॉकलेट्स, बेकरी उत्पादने, फ्रोझन डेअरी आणि बटाट्याचे स्नॅक्स, कंडेन्स्ड मिल्क, पीअनट स्प्रेड, माल्ट-आधारित ड्रिंक यांसारख्या विविध उत्पादनाच्या किंमती कपात केल्या आहेत. दर कमी केलेल्या उत्पादनाची यादीच अमूलने जाहीर केली आहे. त्यानुसार, अमूलने तूप प्रति लीटर ४० रूपयांनी स्वस्त केलेय. अमूल प्रोसेस्ड चीज ब्लॉकची किंमत ३० रूपयांनी कपात झाली आहे. आता एक किलो अमूल प्रोसेस्ड चीज ब्लॉक ५४५ रूपयांना मिळणार आहे. तर १०० ग्रॅम बचर आता ५८ रूपयांना मिळणार आहे. फ्रोझन पनीरची किमतही कपात करण्यात आली आहे. २०० ग्रॅम पनीर ४ रूपयांनी स्वस्त झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.