AMAZON ISSUES LEGAL NOTICE TO PERPLEXITY OVER COMET AI BROWSER FEATURE Saam TV
बिझनेस

Comet AI ब्राउझरला धक्का! Amazon ने Perplexity ला फीचर थांबवण्याची दिली नोटीस

Amazon VS Perplexity: परप्लेक्सिटीच्या कॉमेट एआय ब्राउझरमध्ये यूजर्स थेट अ‍ॅमेझॉनवरून खरेदी करू शकत होते. मात्र आता अ‍ॅमेझॉन हे फिचर थांबवण्याच्या तयारीत आहे.

Dhanshri Shintre

  • Amazon ने Perplexity च्या Comet ब्राउजरविरुद्ध कायदेशीर नोटीस बजावली.

  • फिचरमुळे यूजर्स थेट Amazon वर खरेदी करू शकत होते.

  • Perplexity ने Amazon वर "टेक्नॉलॉजी बुलींग"चा आरोप केला.

  • या वादामुळे AI स्टार्टअप्सना भविष्यात अधिक अडचणी येऊ शकतात.

Perplexity नावाच्या AI स्टार्टअपच्या Comet ब्राउजरशी संबंधित वाद निर्माण झाला आहे. या ब्राउजरमुळे यूजर्स थेट Amazon वरून वस्तू खरेदी करू शकत होते, मात्र Amazon कंपनीने या फिचरवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Amazon च्या म्हणण्यानुसार, त्यांची परवानगी न घेता त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारे खरेदी करणे हे कंपनीच्या नियमांचे उल्लंघन आहे आणि त्यामुळे व्यापाराचे आणि ग्राहक अनुभवाचे नुकसान होऊ शकते. या पार्श्वभूमीवर, Amazon ने Perplexity कंपनीला कडक कायदेशीर नोटीस पाठवून हा फिचर त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे.

Perplexity ने Amazon च्या या कृतीला टेक्नॉलॉजी "बुलींग" असे म्हटले आहे. कंपनीच्या मते, यूजर्सना लाभ मिळावा यासाठी हा फिचर तयार केला होता. मात्र Amazon आपल्या जाहिरात व प्रायोजित परिणामांमधून यूजर्सच्या खरेदीवर नियंत्रण ठेवू इच्छित आहे आणि म्हणूनच AI एजंटना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे.

या घटनेमुळे हे स्पष्ट होते की मोठ्या टेक कंपन्या AI एजंट्स व तृतीय-पक्ष सेवांना सुलभतेने त्यांच्यात प्रवेश करू देणार नाहीत. भविष्यात AI स्टार्टअपना अनेक कायदेशीर व व्यवसायिक अडचणींना तोंड द्यावे लागेल, विशेषत: त्यांच्या टेक्नॉलॉजीमुळे मोठ्या कंपन्यांच्या व्यापारावर किंवा नफ्यावर परिणाम होत असेल तर उद्योगात नव्या रणनीती आणि निर्बंधांची शक्यता निर्माण झाली आहे.

 Amazon आणि Perplexity या वादाचा नेमका मुद्दा काय आहे?

Perplexity चा Comet ब्राउजर वापरकर्त्यांना Amazon वरून थेट वस्तू खरेदी करण्याची परवानगी देतो. Amazon ने सांगितले की हे परवानगीशिवाय केल्याने त्यांच्या नियमांचे उल्लंघन होते.

Amazon ने कोणती कारवाई केली आहे?

 Amazon ने Perplexity ला कायदेशीर नोटीस पाठवली असून हे फिचर त्वरित बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

Perplexity ची भूमिका काय आहे?

Perplexity च्या मते, ब्राउजरचे फिचर वापरकर्त्यांसाठी सोयीचे आहे आणि Amazon चा दृष्टिकोन "टेक्नॉलॉजी बुलींग" आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Bodies Election: नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरताय? अर्ज कसा कराल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Soft Chapati Tips: चपात्या कडक होतात, फुगतच नाहीत? नेमकी कुठे चूक होते? कणिक मळताना घाला '१' पदार्थ

Maharashtra Live News Update: केंद्रीय पथकाकडून धाराशिवमधील पूरग्रस्त भागाची पाहणी; नागरिकांशी साधला संवाद

BSA Thunderbolt ADV: चिखल असो कि खडकाळ रस्ता, तरीही सुसाट धावेल 'थंडरबोल्ट' अ‍ॅडव्हेंचर बाईक; 2026 मध्ये भारतात लाँच

लवकरच पूर्ण होणार रिंगरोड, कल्याण-डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीतून कधी सुटका होणार? आयुक्तांनी सांगितली तारीख

SCROLL FOR NEXT