OnePlus Y-series 43Y1S Pro 43 Saam Tv
बिझनेस

OnePlus Smart TV वर जबरदस्त सूट, 15000 रुपयांनी स्वस्त झाला 43 इंच मॉडेल

Amazon Sale: ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर ग्राहकांना प्रीमियम टेक ब्रँड OnePlus चा प्रिमियम स्मार्ट टीव्ही मॉडेल्स मोठ्या डिस्काउंटमध्ये खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

Satish Kengar

Amazon Sale:

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर ग्राहकांना प्रीमियम टेक ब्रँड OnePlus चा प्रिमियम स्मार्ट टीव्ही मॉडेल्स मोठ्या डिस्काउंटमध्ये खरेदी करण्याची संधी मिळत आहे. कंपनीचे 43-इंच स्क्रीन आकाराचा मॉडेल मूळ किंमतीच्या तुलनेत थेट 15,000 रुपयांनी कमी केला आहे.

वनप्लस स्मार्ट टीव्ही बेझल-लेस डिझाइनसह डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह येतो. याशिवाय OxygenPlay 2.0 आणि OnePlus Connect 2.0 सारख्या फीचर्समुळे हा टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्टही करता येतो. तसेच हा टीव्ही फोनवरूनही नियंत्रित करता येतो. यासोबत स्मार्ट रिमोटही उपलब्ध असून यात व्हॉईस असिस्टंट सपोर्ट असल्याने टीव्ही व्हॉइसद्वारे कंट्रोल करता येतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

OnePlus Y-series 43Y1S Pro 43-इंच स्क्रीनसह भारतात 39,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. यावर आता 38 टक्क्यांच्या डिउंटनंतर हा टीव्ही Amazon वरून 24,999 रुपयांना खरेदी करता येईल. म्हणजेच या मोठ्या स्मार्ट टीव्हीवर Amazon कडून 15,000 रुपयांची सवलत दिली जात आहे. बँक आणि एक्सचेंज ऑफरसह याची किंमत आणखी कमी होऊ शकते. (Latest Marathi News)

यातच ग्राहकांनी Citibank Card, Yes Bank Credit Card, OneCard Credit Card आणि IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास त्यांना 10 टक्कायनपर्यंत अतिरिक्त सवलत मिळू शकते. याशिवाय जुना टीव्ही एक्सचेंज करून 1,600 रुपयांपर्यंत डिस्काउंट ग्राहकांना मिळू शकतो.

OnePlus Smart TV चे फीचर्स

OnePlus च्या 43-इंच स्क्रीन टीव्हीमध्ये Android TV आधारित सॉफ्टवेअर आणि 4K अल्ट्रा HD रिझोल्यूशन आहे. यात OxygenPlay 2.0 आणि OnePlus Connect 2.0 सारखे स्मार्ट कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. यात Chromecast सह मोबाइल डिव्हाइसेसची स्क्रीन मिरर केली जाऊ शकते किंवा त्यावर कास्ट केली जाऊ शकते. या स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला अलेक्सा आणि गुगल असिस्टंटचा सपोर्ट मिळतो.

या टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह 24W क्षमतेचे ड्युअल स्पीकर देण्यात आले आहेत. इतर कनेक्टिव्हिटी पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास, यात तीन HDMI पोर्ट, दोन USB पोर्ट आणि ड्युअल बँड वायफाय आहेत. Netflix, YouTube, Prime Video, Hotstar आणि SonyLiv सारखे अनेक OTT अॅप्स टीव्हीला सपोर्ट करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अचलपुरात बच्चू कडूंना मोठा धक्का; भाजपचे प्रवीण तायडे विजयी

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

SCROLL FOR NEXT