Republic Day Special Jio Recharge Plan  Saam Tv
बिझनेस

Jio Republic Day ची जबरदस्त Offer, एका रिचार्जवर मिळणार 13 हजारपेक्षा जास्त किमतीचे फायदे

Jio Republic Day Special Offer: नवीन वर्ष किंवा गणेश चतुर्थी सारख्या प्रसंगी रिलायन्स जिओ आपल्या युजर्सर्ला बंपर ऑफर्ससह भेट देत असते.

साम टिव्ही ब्युरो

Jio Republic Day Offer:

नवीन वर्ष किंवा गणेश चतुर्थी सारख्या प्रसंगी रिलायन्स जिओ आपल्या युजर्सर्ला बंपर ऑफर्ससह भेट देत असते. आता कंपनीने प्रजासत्ताक दिनानिमित्त Jio Republic Day Offer घेऊन आली आहे. या ऑफरमुळे वार्षिक रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना 13,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अतिरिक्त फायदे दिले जात आहेत.

वार्षिक रिचार्जमध्ये रिलायन्स जिओ युजर्सला हजारो रुपयांचे फायदे मिळत आहेत. यात ग्राहकांना दररोज 2.5GB डेटाही मिळणार आहे. डेली डेटाशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज एसएमएस देखील प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत. तसेच हा रिचार्ज केल्यावर निवडक अॅप्स आणि अनलिमिटेड 5G डेटाचा लाभही ग्राहकांना मिळणार आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहे ऑफर?

जर तुम्हाला नवीन ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला Jio च्या प्रीपेड प्लॅनचा 2,999 रुपये रिचार्ज करावा लागेल. हा वार्षिक प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात ग्राहकांना दररोज 5.5 जीबी डेटा मिळतो. याशिवाय या प्लॅनच्या रिचार्जिंगवर दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. हा प्लॅन घेतल्यावर ग्राहकांना JioTV, JioCinema आणि JioCloud सारख्या अॅप्सचे अॅक्सेसही मिळणार आहे. (Latest Marathi News)

Jio Republic Day च्या ऑफरमुळे मिळणाऱ्या फायद्यांच्या यादीमध्ये अनेक कूपन आणि सवलतींचा समावेश आहे. युजर्सला 299 रुपयांच्या खरेदीवर 125 रुपये सूट देणारी दोन स्विगी कूपन मिळतील. याशिवाय Ixigo वर फ्लाइट बुकिंगवर 1,500 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. हा रिचार्ज केल्यावर Ajio वर 2,499 रुपयांच्या खरेदीवर 500 रुपयांची सवलतही ग्राहकांना मिळणार आहे.

ग्राहकांना Tira वर निवडक उत्पादनांसह खरेदी केल्यास 999 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर 30 टक्के सवलत मिळणार आहे. तसेच रिलायन्स डिजिटल वरून खरेदी केल्यावर निवडक उत्पादनांवर 10 टक्क्यांपर्यंत सूट उपलब्ध आहे आणि कमाल 10,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. अशा प्रकारे एकूण ग्राहकांना एकूण 13,000 रुपयांपेक्षा जास्त लाभ मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आपण सोबत निवडणूक लढलो...पक्षप्रवेशावरील नाराजीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, VIDEO

Maharashtra Live News Update: महाबळेश्वरमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन

Maharashtra Politics : घराणेशाहीचा रेकॉर्ड मोडला; भाजप अन् शिंदे गटाकडून एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी

Winter Health: हिवाळ्यात दिवसभर किती लिटर पाणी प्यावे?

ऐन निवडणुकीत IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली?

SCROLL FOR NEXT