24K Gold Rate Today google
बिझनेस

Today Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याला झळाळी, चांदीलाही चकाकी; पाहा आजचे ताजे दर

Latest Gold Rate Today: जळगाव सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ₹१,००० तर चांदीच्या दरात प्रति किलो ₹२,००० ची वाढ झाली. आखाती देशांतील तणावामुळे सुरक्षित गुंतवणुकीकडे कल वाढल्याने सोने-चांदीच्या भावात पुन्हा तेजी आली आहे.

Namdeo Kumbhar

संजय महाजन| जळगाव प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धडक वक्तव्यानंतर आखाती देशात पुन्हा एकदा युद्धाचे ढग तयार झाले आहेत. याचा परिणाम जागतिक बाजारात झालाय. बुधवारी भारतीय शेअर बाजार कोसळला होता. याचा परिणाम सोन्यावरही झाल्याचे दिसतेय. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ झाली. चांदी प्रति किलो दोन हजार रूपयांनी महागली. तर सोन्याचे दर प्रति तोळा एक हजारांची वाढ नोंदवण्यात आली.

लग्‍नसराई बंद झाल्‍यामुळे सोन्याच्‍या दागिन्‍यांना असलेली मागणी तशी आता कमी झाली आहे. यामुळे गेल्‍या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात घसरण सुरू होती. पण आज (ता.९) मात्र सोन्‍याच्‍या दरात हजार रूपयांची तर चांदीमध्‍ये दोन हजार रूपयांची वाढ झाली आहे. आखाती देशातील युद्धाचं सावटामुळे जागतिक बाजारात सोन्यातील गुंतवणूक वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

आठवड्याच्‍या सुरवातीलाच सोने– चांदीचे दर कमी होवू लागले होते. यामुळे गेल्या दोन दिवसांत चांदीत तीन हजार, तर चांदीत अकरा हजार रुपयांची घसरण झाली. काल (ता. ८) सोन्याच्‍या दरात तीन हजारांची घसरण होऊन सोने एक लाख ४२ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली आले होते. यात आज हजार रूपयांची वाढ होवून सोने (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) १ लाख ४३ हजार ५०० रूपयांवर पोहचले आहे.

आज चांदीच्या दरांमध्‍ये बुधवारी ११ हजारांची घसरण होऊन चांदी दोन लाख २५ हजारांपर्यंत खाली आली होती. यात आज दोन हजार रूपयांची वाढ होवून दोन लाख २७ हजार (प्रतिकिलो, विनाजीएसटी) रूपयांवर पोहचली आहे. आखाती देशातील स्थिती तशीच राहिली तर पुढील काही दिवस दागिन्यांच्या किंमतीत वाढ होईल, असा अंदाज जळगावातील सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

काही दिवसांतील सोन्या-चांदीचे भाव

तारीख--- सोने (प्रतिदहा ग्रॅम)--- चांदी (प्रतिकिलो विनाजीएसटी)

१ जुलै--- १ लाख ४० हजार--- २ लाख २५ हजार

३ जुलै--- १ लाख ४६ हजार ५००--- २ लाख ३८ हजार

६ जुलै--- १ लाख ४५ हजार ५००--- २ लाख ३६ हजार

८ जुलै--- १ लाख ४२ हजार ५००--- २ लाख २५ हजार

९ जुलै--- १ लाख ४३ हजार ५००--- २ लाख २७ हजार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना बारामती मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा

जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख अन् आमदाराच्या पुत्रासह ७ नेत्यांची हाकलपट्टी; एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई

Cotton Candy : कॉटन कँडीचा रंग बदलला! FDA च्या कारवाईनंतर विक्रेत्यांनी घेतला मोठा निर्णय

Kitchen Hacks : चहाची गाळणी काळी पडलीय? 'या' सोप्या ट्रिकने चुटकीसरशी नव्यासारखी चमकेल

Curd and vegetables: रायत्यासोबत या ३ भाज्या खाणं ठरू शकतं धोकादायक! एकाचा तर तुम्ही दररोज बनवता

SCROLL FOR NEXT