Air India  saam tv
बिझनेस

Air India CEO Resigns: एअर इंडियाच्या CEO चा तडकाफडकी राजीनामा, कोण संभाळणार टाटा ग्रुप एयरलाइनची कमान?

Campbell Wilson Resigns Air India CEO : एअर इंडियाचे CEO कॅम्पबेल विल्सन यांनी अचानक राजीनामा दिल्याने टाटा समूहाच्या एअरलाइनमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. विस्तारा विलीनीकरणाच्या पार्श्वभूमीवर आता नवीन CEO कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Namdeo Kumbhar

Air India CEO campbell-wilson Resigns Update : टाटा ग्रुपची एअरलाइन असलेल्या एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी पदाचा राजीनामा दिला. पण नवीन CEO ची निवड होईपर्यंत कॅम्पबेल विल्सन आपल्या पदावर कायम राहणार आहे. इराण-इस्त्राइल या आखाती देशामुळे आलेले संकट आणि अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे (Aviation Disaster) एअर इंडियाच्या अडचणी वाढलेल्या आहेत. अहमदाबाद विमान दुर्घटनेत २६० जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे वारंवार होत असलेल्या तपासणीमुळे एअर इंडियाला सतत तोटा (Financial Loss) सहन करावा लागत आहे. त्यातच सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी राजीनामा (Resignation) दिला.

गेल्या आठवड्यात झालेल्या संचालक मंडळाच्या (Board of Directors) बैठकीत विल्सन यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्याचे वृत्त हिंदुस्तान टाइम्सला सूत्रांनी दिली. एअर इंडिया आणि विस्तारा एअरलाईन्सच्या विलीनीकरणाची प्रक्रिया (Merger Process) सुरू असतानाच सीईओ यांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. टाटा समूहाने एअर इंडियाची धुरा हाती घेतल्यापासून विल्सन हे कंपनीचे नेतृत्व (Leadership) करत होते. पण आता ऐनवेळी त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विल्सन यांच्यानंतर टाटा एअरलाइन्सचा (Tata Airlines) सीईओ कोण होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

कॅम्पबेल विल्सन यांनी राजीनामा का दिला?

मिडिया रिपोर्ट्सनुसार, कॅम्पबेल विल्सन यांनी वैयक्तिक कारणांमुळे आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी ही पदे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तराधिकारी मिळालयानंतर विल्सन न्यूझीलंडला परतणार असल्याचे समजते. विल्सन यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाने महत्त्वाची पावले उचलली होती. एअर इंडिया आणि विस्तारा यांचे एकत्रीकरण करून एक मोठी आणि सक्षम एअरलाईन उभी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.

विस्तारा आणि एअर इंडियाचे विलीनीकरण

टाटा समूहाने अलीकडेच आपली विमान कंपनी 'विस्तारा'चे 'एअर इंडिया'मध्ये पूर्णपणे विलीनीकरण केले आहे. या ऐतिहासिक बदलानंतर एअर इंडिया आता अधिक सामर्थ्याने जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सज्ज झाली आहे. या विलीनीकरणाच्या प्रक्रियेत विल्सन यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. कॅम्पबेल विल्सन यांच्यानंतर आता एअर इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विस्ताराचे माजी सीईओ विनोद कन्नन अथना टाटा समूहातील इतर वरिष्ठ अधिकारी सीईओच्या शर्यतीत असू शकतात, अशी चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदी ३०९० रुपयांनी स्वस्त; २४ अन् २२ कॅरेटचे आजचे दर किती?

वीर जवान सचिन राठोड यांच्यावर अंत्यसंस्कार; परभणीवर दुःखाचा डोंगर

Maharashtra News Live Update: माटुंगा रेल्वे कारशेड मध्ये रेल्वे डब्याला भिषण आग

Rice Cooking Tips: भात चिकट होऊ नये म्हणून काय करायचं? वाचा एकदम सोपी ट्रिक

Shocking: क्रिकेटच्या मैदानात रक्तरंजित थरार, रन आऊट दिल्याने अंपायरची चाकूने भोसकून हत्या

SCROLL FOR NEXT