AI Tools Yandex
बिझनेस

AI Tools: AI मुळे होऊ शकते बत्तीगुल; एकटं ChatGPT दर तासाला वापरतंय 17 हजार घरांइतकी वीज, अहवालातुन खुलासा

Electricity Used By AI Tools : लवकरच आपल्या घरातील बत्तीगुल होण्याची शक्यता आहे. एकटं ChatGPT दर तासाला 5 हजार किलोवॅट वीज वापरत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं आता वीज प्रश्न गंभीर होत आहे.

Rohini Gudaghe

Daily Electricity Uses

अलीकडे आपल्या दैनंदिन जीवनात एआय टूलचा वापर वाढला आहे. आपली कामे सोईस्कर आणि झपाट्याने होत असल्यामुळे आपल्याला एआय टूल चांगले वाटत आहे. परंतु यांच्या वापरामुळे घरातील बत्तीगुल (Electricity) होण्याची शक्यता आहे. यासंबंधी एका अहवालातून धक्कादायक खुलासा झाला आहे. (Latest Marathi News)

जगातील अनेक देशांमध्ये विजेचं संकट आहे. भारतातही अनेकदा विजेबाबत (Artificial intelligence) समस्यांना तोंड द्यावं लागतं. एआय टूल्स जगातील अनेक देशांमध्ये दररोज वापरली जात आहे. बरेचजण चॅट जीपीटीसारखे एआय टूल्स (AI Tools) देखील वापरत आहेत. परंतु हेच एआय टूल्स एक दिवस जगभरात वीज संकटाचं कारण बनू शकतात, असं समोर आलं आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एआय टूल्सकडून विजेचा जास्त वापर

एका अहवालानुसार एआय टूल चॅट जीपीटी (Chatgpt) दर तासाला 5,000 किलोवॅट वीज वापरत आहे. हा वापर फक्त 200 दशलक्ष वापरकर्त्यांच्या दैनंदिन विनंतीवर होत आहे. जर वापरकर्त्यांची संख्या वाढली, तर विजेचा वापर देखील वाढू (Electricity Used By AI Tools) शकतो. सरासरी काढल्यास चॅट जीपीटी सरासरी एका अमेरिकन घरापेक्षा 17,000 पट जास्त वीज वापरत आहे.

एआयचा वापर आणखी वाढल्यास उर्जेचा वापर देखील वाढू शकतो. डेटा सायंटिस्ट ॲलेक्स डी व्रीजच्या मते, जर गुगलने प्रत्येक शोधात जनरेटिव्ह एआय समाविष्ट केले, तर ते दरवर्षी सुमारे 29 अब्ज किलोवॅट प्रतितास वीज वापरू (Daily Electricity Uses) शकते. हा विजेचा वापर जे केनिया, ग्वाटेमाला आणि क्रोएशिया सारख्या संपूर्ण देशांच्या वार्षिक विजेच्या वापरापेक्षा जास्त असेल.

भविष्यात मोठे वीज संकट

प्रत्येक एआय सर्व्हर आधीपासून डझनभर यूकेच्या घरांइतकीच वीज वापरत आहे, असं उघड झालं आहे. मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी एआयच्या एकूण वीज वापराचा अंदाज लावला (Electricity Issue) आहे. त्यामुळे भविष्यात मोठे वीज संकट निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत. एआयचा विजेचा वापर 2027 पर्यंत जागतिक विजेच्या वापरातील महत्त्वपूर्ण वाटा असणार आहे, अशी माहिती अमर उजालाच्या वृत्तानुसार मिळत आहे. ही चिंताजनक बाब आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Home : सर्वसामान्यांच्या स्वप्नांना ब्रेक! म्हाडाच्या घरांची दिवाळीतील सोडत रखडली, जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update : मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रालयात आज दोन महत्त्वपूर्ण बैठका

Pune : पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद | VIDEO

UPI च्या नियमांत ५ दिवसात मोठे बदल; थेट तुम्ही करत असलेल्या ट्रान्झॅक्शनवर परिणाम; वाचा सविस्तर

Asia Cup : संजू सॅमसन, कुलदीपला डच्चू? पहिल्या सामन्यात अशी असेल भारताची प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT