Solar Agri Pump saam tv
बिझनेस

Solar Agri Pump: सौर कृषी पंपची चोरी झालीय? कुठे कराल तक्रार? जाणून घ्या हेल्पलाईन नंबर

Solar Agri Pump Helpline: सौर कृषी पंपाबाबत शेतकऱ्यांनी नोंदवल्यानंतर तक्रारीचे निराकरण तीन दिवसात केलं जाईल. त्याची माहिती शेतकऱ्यांना SMS द्वारे मिळणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता वाढणार आहे.

Bharat Jadhav

सौर कृषी पंपाच्या राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वस्त ऊर्जेचा स्रोत उपलब्ध झालाय. पारंपारिक वीज पुरवठ्यावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता येत असल्यानं शेतीच्या उत्पादनात वाढ होतेय. परंतु सौर पंपामध्ये तांत्रिक बिघाड, उपकरणांचे नुकसान, चोरी, पाण्याचा दाब कमी होणे, वीज जोडणीतील अडचणी अशा समस्या अनेक वेळा उद्भवत असल्याने बळीराजा त्रस्त झालाय. या समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचा वेळ, पैसा अधिक जात असल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. (How To Complaint About Solar Agri Pump)

ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) ने आता एक विशेष हेल्पलाईन सेवा सुरू केलीय. याद्वारे शेतकरी सौर पंपासंदर्भातील कोणतीही तांत्रिक तक्रार घरबसल्या नोंदवू शकतात. तसेच त्याचे त्वरित निराकरण होण्याची हमी मिळवू शकतात. सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सौर ऊर्जेचा वापर करत आहेत. तब्बल 5.65 लाख सौर कृषी पंपांची स्थापना करण्यात आलीय.

दरम्यान पावसाळ्यात आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे अनेक पंपांचे नुकसान होत असते. पावसामुळे सौर पॅनल्समध्ये बिघाड, केबल्स तुटणे, पंप बंद पडणे, किंवा सौर उपकरणांची चोरी होणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांवर लवकर उपाय न झाल्यास बळीराजा त्रस्त होत असतो. त्यामुळेच समस्यांवर तातडीने उपाय करण्यासाठी MSEDCL ने दोन टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांक – 1800-233-3435 आणि 1800-212-3435 सुरू केले आहेत.

या क्रमांकांवर शेतकरी मोफत कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकतात. याशिवाय, http://www.mahadiscom.in/solar_MTSKPY या अधिकृत पोर्टलवरही ऑनलाइन तक्रार नोंदवता येते. तक्रार नोंदवताना शेतकऱ्यांना नोंदणीकृत मोबाईल नंबर, लाभार्थी क्रमांक (Beneficiary ID), तसेच गाव, तालुका आणि जिल्हा यांची माहिती द्यावी लागते. तक्रार नोंदवल्यानंतर तक्रार थेट संबंधित पुरवठादार कंपनीपर्यंत पोहोचवली जाते. ही समस्या ३ दिवसांच्या आत सोडवणे बंधनकारक असते.

या योजनेत आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे सर्व सौर पंपांना विमा संरक्षण देण्यात आले आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे पंपाला नुकसान झाल्यास शेतकऱ्याला भरपाई किंवा मोफत दुरुस्ती दिली जाईल. तसेच MSEDCL ने सर्व पुरवठादार कंपन्यांना जिल्हानिहाय सेवा केंद्रे स्थापन करण्याचे निर्देश दिलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priya Marathe : प्रिया मराठे यांची शेवटची पोस्ट व्हायरल, नवऱ्यासाठी लिहिला होता खास मेसेज

Sambhajinagar : दोन जिवलग मित्रांचा करुण अंत; जनावरे चारताना तलावात पोहण्यासाठी उतरले असता बुडाले

Dengue symptoms neurological: डेंग्यूची लक्षणं हलक्यात घेऊ नका; मेंदूशी संबंधित गुंतागुंती वाढू शकतात, डॉक्टरांचा इशारा

'तो तरूण तुम्हाला बघून हस्तमैथुन..' लोकलमध्ये तरूणीच्या बाजूला बसून घाणेरडं कृत्य, नंतर जे घडलं ते भयंकर

Manoj Jarange Patil Protest Live Updates : शरद पवार दुपारी ३ वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार

SCROLL FOR NEXT