Paytm Shares Fall By 20 Percent, RBI Saam Tv
बिझनेस

RBI च्या अॅक्शननंतर Paytm शेअर धडामधूम ! पेमेंट्स सर्व्हिसमध्ये काय-काय बदललं?

Paytm Shares Fall By 20 Percent: सकाळी मार्केट उघडताच पेटीएमचे शेअर कोसळले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्बधांनंतर १ फेब्रुवारी रोजी फिनटेक कंपनी One97 कम्युनिकेशन्स म्हणजेच Paytm चे शेअर्स कोसळले आहेत. आज पेटीएमचे शेअर २० टक्क्यांनी घसरला.

कोमल दामुद्रे

Paytm Share Price :

सकाळी मार्केट उघडताच पेटीएमचे शेअर कोसळले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्बधांनंतर १ फेब्रुवारी रोजी फिनटेक कंपनी One97 कम्युनिकेशन्स म्हणजेच Paytm चे शेअर्स कोसळले आहेत. आज पेटीएमचे शेअर २० टक्क्यांनी घसरला.

बीएसईवर पेटीएमचे शेअर्स ६०८.८० रुपयांवर उघडले आणि शेअर बाजार उघडल्यानंतर काही मिनिटांत पेटीएमचे शेअर (Share) घसरले. त्यामुळे गुंतवणूकदारांना (Investment) अधिक तोटा झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सर्व सेवांवर बंदी घातली आहे. यामुळे पेटीएमच्या लाखो ग्राहकांवर याचा परिणाम झालेला पाहायला मिळाली आहे. याचा ग्राहकांवर कसा परिणाम होईल जाणून घेऊया.

1. पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी का घालण्यात आली?

पेटीएम (Paytm) पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेने ११ मार्च २०२२ रोजीच बंदी घातली होती. त्याच वेळी मध्यवर्ती बँकेने पेटीएम बँकेला नवीन ग्राहक जोडण्यापासून रोखले होते. ही बंदी अजूनही लागू आहे. त्यावेळी आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला आयटी ऑडिट करण्यास सांगितले होते. या ऑडिमध्ये आढळून आलेल्या त्रुटींमुळे आरबीआयने आता पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घातली आहे.

2. कोणत्या सेवांवर परिणाम होईल?

आरबीआयच्या या बंदीनंतर पेटीएम पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना बचत आणि चालू खाती, प्रीपेड सुविधा, वॉलेट, फास्टॅग, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड ही खाती वापरण्यास अडचणी येतील. आरबीआयची ही बंदी २९ फेब्रुवारी २०२४ पासून लागू होणार आहे. तर सेंट्रल बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यावर तात्काळ बंदी घालतील आहे.

3. पेटीएम पेमेंटचे काय होईल?

आरबीआयच्या बंदीनंतर तुमच्या पेटीएम वॉलेटमध्ये पैसे असतील तर चिंता करु नका. याचा कोणताही परिणाम होणार नाही. यादरम्यान UPI आणि IMPS सारख्या पेमेंटचा वापर करता येईल. तसेच पेटीएम पेमेंट्स बँकेतून पैसे काढता येतील आणि त्याच टाकता देखील येईल. फास्टॅग, नॅशनल मोबिलिटी कार्डमध्ये असणारे पैसे तुम्ही लगेच वापरा. १ मार्चनंतर तुम्हाला यात पैसे अॅड करता येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : बविआचा बालेकिल्ल्यातच भाजपकडून सुपडासाफ; हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर पराभूत

Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगा ब्लॉक; लोकल, एक्सप्रेस गाड्या धावणार उशिराने

Kolhapur Assembly Election: कोल्हापूरकरांनी आर्शीवादाचा 'हात' काढला, महायुतीला १० पैकी १० जागांवर साथ, मविआला धक्का

Ajit Pawar On Election Result: महायुतीच्या विजयाचा फॅक्टर काय? निकाल हाती येताच अजित पवारांनी सगळंच सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT