Inter Caste Marriage Scheme saam tv
बिझनेस

Dr. Ambedkar Foundation Scheme: लग्न करताय? सरकार देत आहे 2.50 लाख रुपये, जाणून घ्या काय आहे योजना...

Inter Caste Marriage Scheme: लग्न करताय? सरकार देत आहे 2.50 लाख रुपये, जाणून घ्या काय आहे योजना...

Satish Kengar

Dr. Ambedkar Foundation Scheme: लग्न हे एक पवित्र नाते मानले जाते, दोन अनोळखी व्यक्ती लग्नगाठ बांधतात आणि नंतर आयुष्यभर एकत्र राहतात. काहीजण अरेंज मॅरेज म्हणजेच कुटुंबातील सदस्यांच्या पसंतीनुसार लग्न करतात. तर काही प्रेमविवाह, म्हणजेच त्यांच्या आवडीनुसार लग्न करतात.

अरेंज मॅरेजमध्ये कोणतीही अडचण येत नाही. परंतु आजही अनेक कुटूंब प्रेमविवाहाच्या विरोधात उभे राहिलेले दिसतात. त्याचबरोबर आंतरजातीय विवाहांमध्ये जोडप्यांना सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागते, कारण लोक या लग्नाला विरोध करतात. दुसरीकडे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते. तर हे कसे, याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

योजनेबद्दल जाणून घ्या

योजनेचे नाव - डॉ. आंबेडकर फाउंडेशन

लाभ - आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला 2.50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

मुख्य पात्रता - यासाठी जोडप्यांपैकी एक दलित समाजाच्या बाहेरील आणि दुसरे दलित समाजातील असणे आवश्यक आहे. (Latest Marathi News)

या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या :

१. जर तुम्हाला डॉ. आंबेडकर फाउंडेशनकडे अर्ज करायचा असेल, तर तुमचे लग्न हिंदू विवाह कायदा 1995 अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

२. जर तुम्ही आंतरजातीय विवाह करत असाल, तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, जे लोक पहिल्यांदा लग्न करत आहेत, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो. दुसऱ्यांदा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा लग्न करणाऱ्या जोडप्यांना अपात्र मानले जाते.

३. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर तुम्ही तुमच्या लग्नाच्या एक वर्षाच्या आत या योजनेसाठी अर्ज करू शकता. यानंतर, फॉर्म भरण्यापासून ते तपास होईपर्यंत प्रक्रिया आणि सर्वकाही योग्य आढळल्यास, जोडप्याला लाभ दिला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT