Atal Pension Yojana Saam Tv
बिझनेस

Government Schemes : वयाच्या ६० नंतर तुम्हाला दरमहा मिळेल ५००० रुपये पेन्शन, अटल पेन्शन योजनेसाठी कसा करायचा अर्ज; वाचा...

Satish Kengar

जर तुम्ही निवृत्तीनंतर तुमच्या आयुष्यासाठी चांगले आर्थिक नियोजन केले नाही, तर वयाच्या ६० नंतर तुम्हाला अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याचमुळे बरेच लोक काम करताना आपल्या उत्पन्नातील काही रक्कम बचत करतात आणि बँकेत जमा करतात.

मात्र आज महागाईत झपाट्याने वाढ होत असताना तुम्ही तुमची बचत चांगल्या ठिकाणी गुंतवावी. जर तुम्हाला तुमच्या भविष्याची काळजी वाटत असेल तर तुम्ही तुमची बचत अटल पेन्शन योजनेत गुंतवू शकता. अटल पेन्शन योजना ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक योजना आहे. निवृत्तीनंतर व्यक्तीचे जीवन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करणे हा या योजनेचा उद्देश आहे. 

१८ ते ४० वर्षे वयोगटातील लोक अर्ज करू शकतात आणि अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक सुरू करू शकतात. गुंतवणुकीची रक्कम तुम्ही अर्ज करत असलेल्या वयाच्या आधारे ठरवली जाते.

जर तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी या योजनेसाठी अर्ज केला तर तुम्हाला या योजनेत दरमहा २१० रुपये गुंतवावे लागतील. तुम्ही ६० वर्षांचे होईपर्यंत तुम्हाला ही गुंतवणूक करावी लागेल. वयाच्या ६० नंतर, तुम्हाला अटल पेन्शन योजनेअंतर्गत दरमहा ५००० रुपये पेन्शन मिळते. 

अटल पेन्शन योजनेत असे खाते उघडा

अटल पेन्शन योजनेत खाते उघडण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जावे लागेल. तेथे तुम्हाला अटल पेन्शन योजनेसाठी उपलब्ध फॉर्म भरावा लागेल.

या दरम्यान, तुम्हाला फॉर्मसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला ते बँकेत जमा करावे लागेल. फॉर्म आणि कागदपत्रे तपासल्यानंतर बँक अधिकारी तुमचे खाते अटल पेन्शन योजनेत उघडतील. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Assembly Election : कुणी शड्डू ठोकला, कुणी गरजला अन् बरसला; अकोल्यात महायुतीत कडकडाट!

Suraj Chavan Movie: प्रेमाच्या नात्यात मित्राची साथ; राजाराणी चित्रपटात सूरज चव्हाणची अनोखी भूमिका

Pune Congress News : कॉंग्रेसचे पुण्यातील 5 उमेदवार ठरले; मोठी अपडेट आली समोर | Marathi News

Accident: नांदेडमध्ये हिट अँड रन; टेम्पोच्या धडकेत वयोवृद्ध पती-पत्नी जागीच ठार, नागरिकांनी रोखला राष्ट्रीय महामार्ग

Curry Leaves Water: दररोज कढीपत्त्याचे पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे!

SCROLL FOR NEXT