Afghan paisa Vs Rupee Google
बिझनेस

Afghan paisa Vs Rupee: अफगाणी पैसा रुपयावर भारी? डॉलरसमोर रुपयापेक्षा अफगाण चलन मजबूत?

Afghan paisa Vs Rupee: अफगान चलन भारतापेक्षा मजबूत आहे का? अफगान भारतापेक्षा गरीब देश असून, त्यांचं चलन इतकं मजबूत कसं? हे जाणून घेऊ. दरम्यान सोशल मीडियावर याबाबत एक मेसेज व्हायरल होत आहे.

Sandeep Chavan

तुम्हाला माहित आहे का? आपल्या रुपयावर अफगाणी पैसा भारी पडतोय...अफगानी पैसा आपल्या रुपयापेक्षा मजबूत असल्याचा दावा करण्यात आलाय,मात्र, या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात. अफगान चलन आपल्या भारतीय चलनापेक्षा भारी आहे...हे ऐकूनच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल...मात्र, असा दावा करण्यात आलाय...खरंच अफगान चलन भारतापेक्षा मजबूत आहे का...? अफगान भारतापेक्षा गरीब देश असून, त्यांचं चलन इतकं मजबूत कसं...? असे अनेक सवाल उपस्थित होतात...मात्र, याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात

व्हायरल मेसेज

अफगाणिस्तानचं चलन भारतीय चलनापेक्षा मजबूत आहे.डॉलरच्या बरोबरीत अफगाणिस्तानचं चलन भारतापेक्षा खाली आहे. भारतीय चलन डॉलरच्या बरोबरीत करावे अशी काही लोकांची अपेक्षा होती, हे आश्चर्यकारक. हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेकांना आश्चर्य वाटू लागलंय...पण, खरंच अफगानी चलन भारतापेक्षा मजबूत आहे का? याची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली. याबाबत एक्सपर्ट मुद्देसूद माहिती देऊ शकतात. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

डॉलरसमोर अफगाण चलनाचा दर 73 इतका

भारताचा रुपया डॉलरसमोर दर 86.62 इतका

अफगाण चलन भारतापेक्षा भारी असण्याची अनेक कारणं

चलन भारी असलं तरी अर्थव्यवस्था भारताचीच मजबूत

अफगाण चलन भारतावर का भारी आहे...? याची कारणं काय आहेत यावर नजर टाकूयात.

अफगाण चलन भारतावर भारी का?

अफगाणिस्तान जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक

अफगाणिस्तानात अमेरिकन डॉलर, पाकिस्तानी रुपयावर बंदी

अफगाणिस्तानात ऑनलाईन व्यापारही करू शकत नाही

अफगाणिस्तानात हवाला व्यवसाय फोफावतोय

अमेरिकन डॉलर्स तस्करीच्या माध्यमातून अफगाणिस्तानात

अफगाणिस्तानच्या चलनात वाढ होण्यामागे एक कारण म्हणजे UN ची मदत ही देखील आहे...अफगाणिस्तानचे चलन मजबूतीचे कारण म्हणजे तालिबानी शासनाने चलन मजबूतीसाठी केलेले प्रयत्न....दुसरे कारण म्हणजे तालिबानी राजवटीमुळे सामाजिक आणि आर्थिक स्थितीमुळे जगभरातून मिळत असलेल्या आर्थिक मदतीमुळे अफगाणी करन्सीची किंमत वाढलीय...त्यामुळे अफगान पैसा भारतावर भारी असल्याचा दावा सत्य ठरलाय...मात्र, त्याचा अर्थ अफगाणिस्ताची अर्थव्यवस्था भारी असा होत नाही...अफगाणिस्तानपेक्षा भारतीय अर्थव्यवस्थाच मजबूत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT