Tata Nexon EV Saam Tv
बिझनेस

Affordable Electric Car: बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार घ्यायचा विचार करताय? हे पर्याय पाहाच!

Electric Car: देशात सध्या इलेक्ट्रिक कारची क्रेझ आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिस वाढत आहे. आपल्या बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार घ्यायचा विचार करत असाल तर या काही इलेक्ट्रिक कार आहेत. ज्या तुम्ही घेऊ शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Budget Friendly Electric Car:

देशात सध्या इलेक्ट्रिक कारची क्रेझ आहे. पर्यावरणपूरक अशा कार अनेकजण खरेदी करतात. देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिस वाढत आहे. मात्र, कार घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजेट. आपल्या बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार घ्यायचा विचार करत असाल तर हे काही पर्याय आहेत. ज्या कार तुम्ही घेऊ शकता. (Latest News)

Tata Nexon EV

टाटाची Tata Nexon EV ही खूप चांगली कार आहे. कंपनीची ही कार मिडियम रेंज आणि लॉंग रेंज अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. कारच्या MR आवृत्तीमध्ये 30kWh बॅटरी देण्यात आली आहे. ही कार 325 किमीची रेंज आणि 127bhp ची टॉप पॉवर जनरेट करते. तर कारची LR व्हर्जन 40.2kWh बॅटरीसह येते. ही कार 143bhp पॉवर जनरेट करते. तर या दोन्ही व्हर्जनमध्ये 215Nm टॉर्क जनरेट होते. या कारची किंमत 14.74 लाख ते19.94 लाख रुपये आहे.

Tata Tiago EV

टाटाची Tata Tiago EV ही दोन बॅटरीपॅक पर्यांयासह उपलब्ध आहे. कारच्या 19.2kWh पॅकमधील कार अंदाजे १८० किमीची रिअल टाइम रेंज देण्यास सक्षम आहे. तर 24kWh पॅकमधील कार 230 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. ही कार 73bhp आणि 114Nm आउटपूट देते. या कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध आहे. या कारची किंमत 8.69लाख ते 12.04 लाख रुपये आहे.

MG Comet EV

एमजी कॉमेट इलेक्ट्रिक कार 17.3kWh बॅटरी पॅकसह सादर करण्यात आली आहे. ही कार एका चार्जवर 230 किमीची रेंज देते. ही कार 110Nm टॉर्क आउटपूट तयार करते. या कारची चार्जिंग ७ तासांत पूर्ण होते. कारची किंमत 7.90 लाख ते 9.98 लाख रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

SCROLL FOR NEXT