Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Aditi Tatkare: लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर! आदिती तटकरेंनी दिली एप्रिलच्या हप्त्याबाबतची अपडेट

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana: आदिती तटकरेंनी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट दिली आहे. एप्रिलचा हप्ता महिलांना कधी मिळणार हे त्यांनी सांगितले आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) चर्चेत आहे. आता लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान, आता एप्रिलच्या हप्त्याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

लाडक्या बहि‍णींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? (Ladki Bahin Yojana April Month Installment)

काल आदिती तटकरे पुण्यात माध्यमांशी बोलत असताना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याबाबत माहिती दिली आहे. आदिती तटकरे म्हणाल्या की, एप्रिल महिना संपण्याआधी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वितरीत केला जाणार आहे. दरम्यान, आदिती तटकरेंनी अद्याप तारीख सांगितलेली नाही. परंतु आठवड्याभरात एप्रिलचा हप्ता देण्याची शक्यता आहे. मिडिया रिपोर्टनुसार, अक्षय तृतीयेच्या दिवशी एप्रिलचे १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

आदिती तटकरे काय म्हणाल्या?

सध्या लाडकी बहीण योजनेचे नियम बदलणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या सगळ्यावर आदिती तटकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. मला वाटतंय या योजना संदर्भात गैरसमज करून घेतला आहे, अडीच लाखांपेक्षा कमी उत्पादन असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

ज्या महिला संजय गांधी निराधार योजनचा लाभ घेतात ते या योजनेसाठी पात्र नाही. ज्या महिला नमो शेतकरी योजेतून लाभ घेतात त्यांना 1000 रुपये लाभ मिळतो, मात्र त्यांना 1500 मिळावे म्हणून लाडक्या बहिण योजकडून त्यांना 500 रुपये लाभ मिळतो हे सर्व शासन निर्णय आहे.२ कोटी ४७ लाख महिला लाभार्थी आहेत, शेवटचा लाभ दिला तेव्हा 2 कोतो 33 लाख महिला होत्या, ज्या महिला पात्र आहेत त्यांना हा लाभ मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

SCROLL FOR NEXT