Adani Shares After Hindenburg Report  
बिझनेस

Adani Share: हिंडनबर्गच्या आरोपानंतर शेअर मार्केट कोसळलं; तरीही अदानी समूहाच्या 'या' दोन शेअर्सचा बोलबाला

Bharat Jadhav

हिंडेनबर्गने शनिवारी अदानी समूहावर गंभीर आरोप करणारा अहवाल जाहीर केला होता. त्यामुळे सोमवारी शेअर बाजारात बरीच अस्थिरता होती. बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात चढ-उतार पाहायला मिळाली. धोक्याच्या लाल चिन्हावर मार्केट सुरू झाल्यानंतर तासाभरातच सेन्सेक्स-निफ्टीने जोरदार गती घेतली. यात अदानी समुहाचे देखील शेअर्स होते. हिंडेनबर्गच्या अहवालाचा शेअर्सवर फारसा परिणाम झाला नाही. अदानी समुहातील दोन कंपन्यांचे शेअर्स सुरुवातीला घसरले होते, त्यानंतर सावरत ते ग्रीन झोनमध्ये आले. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाच्या १० कंपन्या शेअर्स बाजारमध्ये सूचीबद्ध आहेत.

सुरुवातीला हे सर्व १० शेअर्स रेड झोनमध्ये व्यवहार करत होते. ज्यावेळी सेन्सेक्स आणि निफ्टीने पलटी मारली त्यावेळी अदानी शेअर्सनेही चाल बदलली. अदानी ग्रीन एनर्जी शेअर सुरुवातीच्या व्यापारात ४ टक्क्यांहून अधिक घसरला होता, परंतु दुपारी २ च्या सुमारास तो अचानक ग्रीन झोनमध्ये आला आणि १६६७.५० रुपयांपर्यंत घसरल्यानंतर तो १८१५ रुपयांपर्यंत पोहचला. अदानी ग्रीनसोबतच गौतम अदानी यांच्या सिमेंट कंपनी अंबुजा सिमेंटचे शेअर्सही रेड झोनमधून बाहेर पडत आणि सेन्सेक्स-निफ्टीच्या बरोबरीने ग्रीन झोनमध्ये व्यवहार करताना दिसले.

अंबुजा सिमेंटचा शेअर १.२० टक्क्यांच्या वाढीसह ६४१ रुपयांच्या स्थरावर व्यवहार करत होता. सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये हा शेअर्स ६१७.७५ रुपयांच्या स्तरापर्यंत खाली आला होता.

अदानींच्या इतर शेअर्सची स्थिती काय?

Adani Group अदानी ग्रुपचे इतर कंपन्याचे शेअर्स Adani Ent Share (-1.40%), Adani Power Share (-0.49%), Adani Total Gas (-3.75%), Adani Wilmar (-2.56%), Adani Energy Solutions (-3.33%), Adani Port Share (-1.32%), ACC Ltd Share (-0.97%) और NDTV Share (-2.60%) खाली घसरले होते.

स्टॉक मार्कटमध्ये सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स ३०० अंकांनी पेक्षा जास्त अंकांनी खाली घसरला होता. या घसरणीसह ७९,३३०.१२ च्या स्थरावरून व्यवहार सुरू केला होता. शनिवारी जाहीर झालेल्या अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गच्या अहवालाचा परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीवर दिसून येईल अशी अपेक्षा होती,त्यानुसार बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारातही तेच दिसून आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT