Aadhar card New Rules  Saam tv
बिझनेस

Aadhar card New Rules : आधार कार्डबाबत मोठी अपडेट; आता बदल करण्यासाठी ४ कागदपत्रे अत्यंत आवश्यक, वाचा सविस्तर

Aadhar card New Rules update : आधार कार्डबाबत मोठी अपडेट आलीये. आता बदल करण्यासाठी ४ कागदपत्रे अत्यंत आवश्यक असणार आहेत.

Vishal Gangurde

आधार कार्डबाबत महत्वाची अपडेट आली आहे. जुन्या आधारकार्डात नाव, पत्ता आणि फोटो बदलण्याच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नव्या कागदपत्रांची यादी जारी करण्यात आली आहे.

UIDAI ने स्पष्ट केले आहे की, 'एखाद्याच्या नावाचे चुकून दोन आधारकार्ड तयार झाले असतील. तर पहिल्यांदा जारी करण्यात आलेलं आधार कार्ड वैध मानले जाईल. त्यानंतर इतर आधारकार्ड रद्द करण्यात येईल.

आधार कार्डसाठी ४ महत्वाचे कागदपत्रे

ओळखपत्र - पासपोर्ट, पॅनकार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी उपक्रमातून जारी करण्यात आलेलं ओळखपत्र, नरेगा जॉब कार्ड, पेन्शन ओळखपत्र, केंद्र सरकारची आरोग्य योजना, तृतीयपंथींना मिळालेलं ओळखपत्र या सारख्या कागदपत्रांचा वापर करता येईल.

घराचा पत्ता : घराच्या पत्त्यासाठी वीज बिल, पाण्याचा बिल, गॅसचे बिल आणि लँडलाइन बिल हे तीन महिन्यापेक्षा जुना असावा. तसेच बँक पासबुक किंवा बँक स्टेंटमेंट, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, भाडे करार, पेन्शन कागदपत्रे, राज्य किंवा केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेलं आवास प्रमाण पत्राचा वापर करता येईल.

जन्म दाखला - दहावी/बारावीच्या निकालाची प्रत, पासपोर्ट, पेन्शन कागदपत्रावर जन्माची तारीख उल्लेख असलेले कागदपत्रे, राज्य किंवा केंद्र सरकारने दिलेल्या प्रमाणपत्रात जन्म तारखेचा उल्लेख असल्यास त्याही कागदपत्राचा वापर करता येईल.

विवाह प्रमाणपत्र- लग्नाच्या दाखल्याची गरज असल्यास तेही सादर करावं लागेल.

आधार अपडेट कसं करायचं?

myAadhaar पोर्टलवर लॉगइन करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नमूद करा. पुढे कागदपत्रे अपलोड करा. तुम्ही UIDAI सिस्टीममध्ये व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अपडेट करु शकतात. अपडेट केल्यानंतर त्याची डिजिटल कॉपी डाउनलोड करता येईल. ही संपूर्ण प्रक्रिया ३-५ दिवसांच्या कार्यालयीन वेळेत पूर्ण केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2025: सर्व पितृ अमावस्येला या ४ ठिकाणी लावा दिवा, लक्ष्मी अन् पितर दोन्ही होतील प्रसन्न

Maharashtra Live News Update: नांदेडच्या मुखेड शहरात भीषण अपघात, 7 ते 8 जण गंभीर

Shocking : पत्नीला अंघोळ करताना तरुणाने पाहिलं, व्हिडीओ बनवून पती विषारी औषध प्यायला अन् पुढे...

बस झालं ना दादा... अजित पवारांसामोरच धनंजय मुंडे संतापले | VIDEO

Husband Wife Clash : नवरा गाढ झोपेत, बायको दबक्या पावलाने आली अन् अंगावर ओतलं उकळतं पाणी; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT