Aadhaar Card Google
बिझनेस

Aadhaar Card : हॉटेलमध्ये आधार कार्ड देताय? हे काम आवर्जुन करा; अन्यथा मोठं नुकसान होईल!

Aadhar Card News: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वाचे कागदपत्रं आहे. कधीही तुम्ही तुमचं ओरिजनल आधार कार्ड हे हॉटेल्समध्ये देऊ नये. अन्यथा तुमच्यासोबत स्कॅम होऊ शकतो.

Siddhi Hande

भारत देशातील नागरिकांसाठी आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे आहे. आधार कार्ड हे भारताचे रहिवासी असल्याचे कागदपत्र आहे. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्ड हे गरजेचे आहे. बँकेतील कामे किंवा सराकारी कामांसाठी आधार कार्ड गरजेचे आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला आधार कार्ड देताना काळजी घ्यावी.

आपण अनेकदा हॉटेलमध्ये चेक इन करताना आधार कार्ड देतो, झेरॉक्स काढण्यासाठी आधार कार्ड देतो. परंतु यामुळे अनेकदा लोक तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करतात. ते आपल्या आधार कार्डच्या माध्यमातून महत्त्वाचा डेटा चोरी करु शकतात.

आधार कार्डमुळे तुमचे बँकिंग फ्रॉड होऊ शकतात. त्यामुळे जर कोणत्याही हॉटेलमध्ये बुकिंग करताना नेहमी मास्क्ड आधार कार्ड वापरले पाहिजे. मास्क्ड आधार कार्डमध्ये ८ नंबर दिसत नाही. त्यामुळे तुमचा संपूर्ण आधार नंबर समोरच्या व्यक्तीला समजत नाही. परिणामी तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारचा फ्रॉड होत नाही.

मास्क्ड आधार कार्ड म्हणजे काय?

मास्क्ड आधार कार्ड हे सामान्य आधार कार्डएवढेच महत्त्वाचे आहे. मास्क्ड आधार कार्डचा वापर तुम्ही ओळखपत्र म्हणून करु शकतात. यावर ८ नंबर दिसत नाही. फक्त शेवटचे चार नंबर या आधार कार्डवर दिसतात.त्यामुळे तुमची संपूर्ण माहिती समोरच्या व्यक्तीला समजत नाही. लांबचा प्रवास करतानादेखील तुम्ही मास्क्ड आधार कार्डचा वापर करु शकतात.

मास्क्ड आधार कार्ड डाउनलोड कसं करावं?

सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

त्यावर तुम्हाला My Aadhar असा ऑप्शन दिसेल.

यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून कॅप्चा टाकावा लागेल. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून ओटीपी टाका.

यानंतर तुम्हाला डाउनलोड असा ऑप्शन दिसेल. त्यानंतर चेक बॉक्समध्ये डाउनलोड मास्क्ड आधार कार्ड या ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर तुम्ही तुमचे मास्क्ड आधार कार्ड डाउनलोड करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Museum Robbery: दिवसाढवळ्या लूव्र संग्रहालयात दरोडा; नेपोलियन आणि जोसेफिनचे दागिने चोरीला

Maharashtra Live News Update : ज्या संविधानाने देशाला एकसंघ ठेवले,पंतप्रधान मोदी म्हणतात की गीता बायबल कुराण पेक्षा संविधान हे प्रिय आहे - देवेंद्र फडणवीस

Moong Dal Sheera Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग आजचं घरी बनवा हॉटेल स्टाईल मूग डाळ शीर

Rapid Weight Gain: वजन झपाट्याने वाढत चाललंय; थांबा आताच व्हा सावध, होतील 'हे' गंभीर आजार

Nagpur Tourism : पक्षीप्रेमींसाठी नागपूरमधील बेस्ट लोकेशन, एकदा नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT