Aadhaar Card Update Saam Tv
बिझनेस

Aadhaar Card: आताच करा हे काम! आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी उरले फक्त ४ दिवस

Aadhaar Card Update: आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. १४ डिसेंबर ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख आहे.

Siddhi Hande

प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्डशिवाय अनेक सरकारी कामे होत नाही. प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी तुमच्याकडे भारतीय नागरिक असल्याचा पुरावा असणे गरजेचे आहे. हा पुरावा म्हणजे आधार कार्ड.

आधार कार्ड हे दर दहा वर्षांनी अपडेट करायचे आहे. आधार कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही मोफत आधार कार्ड अपडेट करु शकतात. आता मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शेवटचे काही दिवस उरले आहेत.

आधार कार्ड हे दर दहा वर्षांनी अपडेट करायचे असते. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ डिसेंबर आहे. त्यामुळे मोफत आधार अपडेट करण्यासाठी शेवटचे ४ दिवस उरले आहेत. त्यामुळे जर तुम्ही अजूनही आधार कार्ड अपडेट केले नसेल तर लगेच करा.

जर तुम्ही १४ डिसेंबरनंतर अपडेट केले तर तुम्हाला पैसे भरावे लागू शकतात. आधार कार्ड तुम्ही यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अपडेट करु शकतात. यात तुम्ही फोटो, नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर अपडेट करु शकतात.

आधार कार्ड अपडेट कसं करायचं? (How To Update Aadhaar Card)

तुम्ही सर्वप्रथम myaadhaar.uidai.gov.in या वेबसाइटवर जावे.

त्यानंतर लॉग इन करा.

प्रोफाइल टॅबवर क्लिक करा. त्यानंतर जी माहिती अपडेट करायची आहे त्यावर क्लिक करा.

यानंतर आवश्यक कागदपत्रे सबमिट करा. यानंतर तुमचे आधार कार्ड अपडेट होईल. हे आधार कार्ड तुम्ही यूआयडीएआयच्या वेबसाइटवरुन डाउनलोड करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शौर्यभूमीत भारताच्या चाणक्यांचा स्वागत बॅनर काढला

Purandar Fort : पुण्याजवळील ऐतिहासिक पुरंदर किल्ला, 'या' गोष्टी वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

महिनाभर रोज न चुकता करा योगा, शरीरात होतील आश्चर्यकारक 5 बदल

Gold Prices Today: आनंदाची बातमी! महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

Abhijeet Dipke : जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या यशाचं क्रेडिट कोणाचं? अभिजित दीपकेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT