Aadhaar Card Free Update Saam Tv
बिझनेस

Aadhaar Card Update: उरले शेवटचे ११ दिवस! या तारखेपूर्वी करा मोफत आधार अपडेट; अन्यथा येतील अडचणी

Aadhaar Card Free Update Deadline: आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी शेवटचे काही दिवस उरले आहेत. आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ जून आहे.

Siddhi Hande

प्रत्येक भारतीयांसाठी आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र असते. आधार कार्डशिवाय अनेक कामे होत नाहीत. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड अपडेट करु शकतात. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ जून २०२५ आहे.

UIDAI ने नागरिकांना मोफत आधार कार्ड अपडेट करण्यास सांगितले आहेत.युजर्संना myAadhaar या ऑनलाइन पोर्टलवर जाऊन माहिती अपडेट करायची आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अवघे ११ दिवस उरले आहेत. त्यामुळे त्याआधी आधार कार्ड अपडेट करायचे आहे.याआधी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती.

कोणती माहिती मोफत अपडेट करु शकतात? (Aadhaar Card Free Update)

जर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर ही माहिती तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. तुम्ही आयडेंडिटी प्रुफ (वैयक्तिक माहिती), पत्ता ऑनलाइन पद्धतीने अपडेट करु शकतात. तुम्ही १५ जून २०२५ नंतर ऑफलाइन पद्धतीने आधार कार्ड अपडेट करु शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला ५० रुपये चार्ज द्यावे लागणार आहे.

आधार कार्ड ऑनलाइन कसं अपडेट करायचं?

सर्वात आधी तुम्हाला myAadhaar पोर्टल (https://myaadhaar.udai.gov.in)वर जावे लागेल.

यानंतर आधार नंबर आणि ओटीपी टाकून लॉग इन करा.

यानंतर तुमचा आयडेंडिटी प्रुफ आणि पत्ताच्या पुराव्याच्या कॉपी अपलोड करायची आहे.

यानंतर रिक्वेस्ट सबमिट करा. हा १४ अंकी नंबर असणार आहे.हा नंबर नोट करा.

जर तुम्हाला पत्ता अपडेट करायचा असेल तर आधार सेल्फ सर्विस अपडेट पोर्टलवर लॉग इ करा.

यानंतर प्रोसेस टू अपडेट आधारवर क्लिक करा.

यानंतर नवीन पत्ता टाका आणि त्याचा प्रुफ अपलोड करा.

यानंतर रिक्वेस्ट मंजुर झाल्यानंतर तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यासाठी दोन अश्व सज्ज

पावसाळ्यात मिळणारी चमचमीत आणि औषधी तरोटा भाजी, एकदा तरी नक्की खा

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर 3 टक्क्यांपेक्षा कमीच राहणार? आठव्या वेतनाबाबत आली मोठी अपडेट

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT