Aadhaar Card Saam Tv
बिझनेस

Aadhaar Card: आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढली; जाणून घ्या प्रोसेस

Aadhaar Card Free update: आधार कार्ड हे दर दहा वर्षांनी अपडेट करणे अनिवार्य आहे. आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे.

Siddhi Hande

प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्डशिवाय कोणतेच काम होत नाही. प्रत्येक सरकारी कामाला आधार कार्डची गरज पडते. आधार कार्ड हे दर दहा वर्षांनी अपडेट करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केले नाही तर तुम्हाला अनेक समस्या येऊ शकतात. तर आता मोफत आधार अपडेट करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. (Aadhaar Card)

आता तुम्ही १४ जून २०२५ पर्यंत आधार कार्ड अपडेट करु शकतात. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने मोफत आधार अपडेट करु शकतात. UIDAIने याबाबत माहिती दिली आहे.

आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवल्यामुळे लाखो लोकांना फायदा होणार आहे. ही मोफत सर्व्हिस फक्त ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड अपडेट करणाऱ्यांसाठी आहे. आधार कार्डधारकांनी आपली माहिती योग्य वेळी अपडेट करावी, हा यामागचा उद्देश आहे.जर तुम्ही कोणतेही कागदपत्र अपडेट करत असाल तर ऑनलाइन पद्धतीने मोफत अपडेट करु शकतात.

आधार अपडेट करण्याची प्रोसेस (Aadhaar Card Update Process)

सर्वप्रथम तुम्ही यूआयडीएआयच्या myaadhaar.uidai.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करा.

यानंतर माय आधारवर क्लिक करा. त्यानंतर अपडेट आधार या ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर तुम्ही तुमचे आधार डिटेल्स टाका. त्यानंतर कागदपत्रं अपडेटवर क्लिक करा.

यानंतर आधार नंबर टाका.त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो टाकून लॉग इन करा.

या गोष्टी ऑनलाइन अपडेट होत नाही

जर तुम्हाला बायोमॅट्रिक अपडेट करायचे असेल तर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. फिंगरप्रिंट, मोबाईल नंबर, फोटो अपडेटसाठी आधार केंद्रावर जावे लागेल. ऑफलाइन पद्धतीने आधार अपडेट करायचे असेल तर तुम्हाला शुल्क भरावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT