8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत लवकरच निर्णय; आठव्या वेतन आयोगाबाबत नवीन अपडेट

8th Pay Commission Meeting: आठव्या वेतन आयोगाबाबत काम आता खऱ्या अर्थाने सुरु झाले आहे. आठव्या वेतन आयोगात समितीची आता बैठक होणार आहे. या समितीसाठी नवीन ऑफिस सुरु करण्यात आले आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट

आठव्या वेतन आयोगासाठी नवीन ऑफिस स्थापन

आठव्या वेतन आयोगाची या दिवशी होणार बैठक

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. दरम्यान, आत आठव्या वेतन आयोगात पगारवाढ करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर आता दिल्लीत यासाठी कार्यालय स्थापन करण्यात आले आहे.

आठव्या वेतन आयोगातील समितीला शिफारसी सादर करण्यास सांगितले आहे.शिफारसी सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा वेळ दिला आहे. दरम्यान, आता या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असं म्हणाला हरकत नाही.

आठव्या वेतन आयोगाच्या समितीचे ऑफिस जनपथ येथे चंद्रलोक बिल्डिंगमध्ये आहे. या कार्यालयात आठव्या वेतन आयोगाबाबतचे काम होणार आहे. आता ऑफिस स्थापन झाल्यानंतर कामांना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, याचा थेट परिणाम केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांवर होणार आहे. महागाई भत्ता, पेन्शनसंबंधित अनेक निर्णय होऊ शकतात.

या दिवशी होणार बैठक

केंद्रीय कर्मचाऱ्यांबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे प्रतिनिधित्व करणारी नॅशनल काउंसिगची स्टाफ साइड ड्राफ्टिंग कमेटीसोबत बैठक होणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी ही बैठक होणार आहे. फिरोजशाह रोड येथील कार्यालयात ही बैठक होणार आहे. यामध्ये रेल्वे, सुरक्षा, पोस्ट विभाग, इन्कम टॅक्स विभागातील प्रमुख कर्मचारी सहभागी होणार आहे. एक आठवडाभर याबाबत चर्चा होऊ शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत वेतन, महागाई भत्ता, इतर भत्ते, प्रमोशन, पेन्श आणि इतर विषयंवर चर्चा होऊ शकते. यासंदर्भातील प्रस्तावांवर मसुदा तयार केला जाईल. हा मसुदा वेतन आयोगाला दिला जाईल. यानंतर निर्णय घेतला जाईल. यासाठी कर्मचारी संघटनांनी आधीच तयारी सुरु केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला 26 जानेवारीला सुट्टी

Black Coffee: ब्लॅक कॉफी पोटाची चरबी कमी करते का? जाणून घ्या ब्लॅक कॉफीचे फायदे

Shahid Kapoor Fitness Secret: ''घरचं खा अन् फीट राहा'' शाहिद कपूरने सांगितलं त्याचं डाएटचं सिक्रेट

Bigg Boss Marathi 6: 'याची बाहेर गर्लफ्रेंड...'; आयुष आणि तन्वीचा लव्ह अँगल खोटा? रुचिताने केली पोलखोल

Shivali Parab Photos: पिवळी साडी आणि पिवळी चोळी, शिवाली परबची हटके स्टाईल

SCROLL FOR NEXT