Pension Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पेन्शनधारकांना महागाई भत्ता मिळणार नाही? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाबाबत एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये आठव्या वेतन आयोगात पेन्शनधारकांना महागाई भत्ता मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

पेन्शनधारकांना मिळणार नाही महागाई भत्ता?

व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना पगारवाढ कधी मिळणार असा प्र्न विचारला जात आहेत. दरम्यान आता आठव्या वेतन आयोगात पेन्शनधारकांना महागाई भत्ता मिळणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे. यामागचे कारण म्हणजे पेन्शनधारकांसाठी एक व्हॉट्सअॅप मेसेज व्हायरल होत आहे.

व्हायरल मेसेज काय आहे?

व्हायरल होणाऱ्या या मेसेजमध्ये सांगितले की, फायनान्स अॅक्ट २०२५ नुसार, महागाई भत्ता वाढ आणि वेतन आयोगाचा फायदा मिळणार नाही. यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणारा महागाई भत्ता आणि पेन्शनमध्ये कपात होणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

PIB ने याबाबत माहिती दिली आहे. व्हायरल होणारा हा मेसेज खोटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. PIB ने सांगितले की, सरकारने कोणत्याही प्रकारचा महागाई भत्ता किंवा वेतन आयोगातील फायदे बंद केले नाहीत. या अफवांमुळे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गैरसमजामुळे हा मेसेज व्हायरल होत आहे.

ही अफवा CCS (Pension) Rules 2021 च्या Rule 37(29)(c) बदलामुळे झाली आहे. नवीन नियमानुसार जर सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर PSU मध्ये काम करत असेल आणि त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले तर त्यांच्या सेवानिवृत्तीचे फायदे बंद केले जाऊ शकतात. म्हणजेच जर PSU मध्ये misconduct झाल्यावरच त्याचा परिणाम होणा आहे. त्यामुळे इतर सरकारी कर्मचाऱ्यांवर याचा काहीच परिणाम होणार नाही.PIB नेसांगितले की महागाई भत्ता आणि वेतन आयोगातील फायदे न मिळण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? (8th Pay Commission Implementation Date)

आठवा वेतन आयोग लागू होण्यास उशिर होऊ शकतो. आठव्या वेतन आयोगासाठी नवी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती १८ महिन्यात शिफारसी सादर करेल. त्यानंतर या शिफारसी सरकार मान्य करेल. यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये १९ लाखांचा पानमसाला- साठा जप्त FDA ची धडक छापेमारी

Ladki Bahin Yojana: अपात्र असतानाही ₹१५०० घेतले, कारवाई होणार का? आदिती तटकरेंनी एका वाक्यात विषय संपवला

Weight loss: वजन कमी करायचं आहे? मग मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी करा 'ही' योगासन

ICC Ranking: दो भाई, दोनों तबाही! ICC वनडे रँकिंग पाहून रोहितच्या चाहत्यांना धडकी भरेल

BP Control Tips: थंडीत बीपी वाढतोय? नियंत्रणात ठेवण्यासाठी हे उपाय ठरतील फायद्याचे

SCROLL FOR NEXT