The 8th Pay Commission may bring major changes to the salary structure of government employees. saamtv
बिझनेस

8th Pay Commission: नवा फॉर्मुला बदलणार कर्मचाऱ्यांचं नशीब; पगारासह, पेन्शन आणि भत्त्यांवर होणार मोठा परिणाम

8th Pay Commission latest updates: आठव्या वेतन आयोगामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत मोठे बदल होऊ शकतात.वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन लाभांवर थेट परिणाम होऊ शकतो.

Bharat Jadhav

  • आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या.

  • ‘फॅमिली युनिट’ सूत्र पगार आणि पेन्शन ठरवण्यात महत्त्वाचे.

  • कर्मचारी संघटनांनी सूत्र बदलण्याची मागणी केली.

आठव्या वेतन आयोगाच्या स्थापन सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना वाटतं की, पगार केवळ महागाई भत्ता (डीए) किंवा फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असतो, परंतु यामागे 'फॅमिली युनिट' नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो.

कर्मचारी संघटनांनी सरकारकडे हे सूत्र बदलण्याची मागणी केली आहे. कारण यावरूनच तुमचा मूळ पगार, भत्ते आणि निवृत्तीवेतन ठरत असते. हे 'कुटुंब युनिट' काय आहे आणि त्याचा तुमच्या खिशावर कसा परिणाम होतो, हे समजून घेऊ.

'कुटुंब युनिट' फॉर्मुला म्हणजे काय?

हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊ, एका सामान्य सरकारी कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला सन्मानजनक जीवन जगण्यासाठी किमान किती रक्कम आवश्यक असते, याचा अंदाज वेतन आयोग सर्वप्रथम लावत असते. या प्रक्रियेला 'कुटुंब युनिट' म्हटले जाते.

आधार: ही प्रणाली 'आयक्रॉइड सूत्रा'वर आधारित आहे, जे अन्न, वस्त्र आणि निवारा यांसारख्या मूलभूत गरजांवरील खर्चाची गणित करत असते.

रचना: परंपरेनुसार, यामध्ये कर्मचारी, नवरा-बायको आणि मुले यांचा समावेश असतो. त्यांच्या एकूण खर्चाच्या आधारावर किमान मूळ वेतन निश्चित केले जाते.

कुटुंबातील सदस्य संख्येचा पगारावर कसा परिणाम होतो?

फॅमिली युनिट हे पगार वाढीच्या प्रक्रियेत एक 'मल्टीप्लायर' म्हणून काम करते.

किमान (न्यूनतम) खर्च : जर वेतन आयोगाने असे गृहीत धरले की कुटुंबाला आता अन्न, शिक्षण आणि आरोग्यावर पूर्वीपेक्षा जास्त खर्च करावा लागतो, तर 'किमान खर्चा'चा अंदाज वाढेल.

पगारवाढ: मूळ पगार वाढल्याने संपूर्ण वेतन रचना बदलते, म्हणजेच कुटुंबातील सदस्यांची संख्या किंवा त्यांच्या गरजांचा वाढलेला अंदाजानुसार मूळ पगार आणि फिटमेंट फॅक्टर थेट वाढतात.

जुना फॉर्मुला आता निरुपयोगी, कामगार संघटनांची मागणी काय?

कर्मचारी संघटनांचा असा युक्तिवाद आहे की, सध्याचे सूत्र अनेक दशके जुने असून ते आजच्या वास्तवापासून खूप दूर आहे.

बदलणारे खर्च: एके काळी अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा होत्या. आज शहरांमधील राहण्याचा खर्च, मुलांच्या खाजगी शाळांची फी, महागडी रुग्णालये आणि वाहतूक खर्च प्रचंड वाढले आहेत.

पालकांची जबाबदारी:

कामगार संघटनांची अशी इच्छा आहे की 'कुटुंब' या संकल्पनेत केवळ मुलांचाच नव्हे, तर वृद्ध पालकांचाही समावेश असावा, कारण कर्मचारी देखील त्यांना आधार देतात. तज्ज्ञांच्या मते, भारत आता विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे पगार केवळ 'जगण्यासाठी' नसावा, तर चांगल्या जीवनमानासाठी असावा.

कर्मचाऱ्यांसाठी त्याचे महत्त्व

जर आठव्या वेतन आयोगाने 'कुटुंब एकक' सूत्रामध्ये सुधारणा केली, तर त्याचा परिणाम केवळ मूळ वेतनावरच नाही, तर महागाई भत्ता (डीए), घरभाडे भत्ता (एचआरए) आणि निवृत्तीवेतनावरही होईल. यामुळे फिटमेंट फॅक्टरमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. यामुळे सरकारवरील आर्थिक भार वाढेल. परंतु लाखो कर्मचाऱ्यांसाठी, वाढती महागाई आणि जीवनशैलीवरील खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा एक मोठा दिलासा ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

SCROLL FOR NEXT