8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; २०२८ पर्यंत लागू होणार?

8th Pay Commission Implementation Date: आठवा वेतन आयोग लागू होण्यास अजून वेळ लागू शकतो. आता आठवा वेतन आयोग लागू होण्यास २-३ वर्षांचा कालावधी लागेल, असं बोललं जात आहे.

Siddhi Hande

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार?

आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. केंद्र सरकारने २०२५ च्या सुरुवातीला आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती. मात्र, आता हा वेतन आयोग लागू होण्यास अजून उशिर होणार आहे, असं सांगण्यात येत आहे. ऑक्टोबर महिना सुरु झाला तरीही अजून आठव्या वेतन आयोगाबाबत कोणतीही अधिकृत अधिसूचना, संदर्भांच्या अटी समोर आल्या नाहीत. याचसोबत समिती स्थापन झालेली नाही.

आठवा वेतन आयोग लागू करण्याआधी समिती स्थापन केली जाते. ही समिती आधी रिसर्च करते. त्यानंतर हा निर्णय लागू केला जातो. दरम्यान, अजून अशी कोणतीही समिती स्थापन झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

२०२८ मध्ये लागू होणार आठवा वेतन आयोग

आठवा वेतन आयोगाची समिती स्थापन करण्यापासून ते लागू करण्यासाठी जवळपास २ ते ३ वर्षांचा कालावधी लागतो. दरम्यान, अजून कोणतीही प्रोसेस झालेली नाही. त्यामुळे आठवा वेतन आयोग लागू होण्यास अजून खूप वेळ लागेल. दरम्यान, २०२८ मध्ये आठवा वेतन लागू होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मागचा वेतन आयोग लागू होण्यास जवळपास २ वर्षांचा कालावधी

७वा वेतन आयोगाबाबत २०१४ मध्ये घोषणा झाली होती. त्यानंतर लगेचच २०१४ मध्ये याची ToR निश्चित झाली. यानंतर नोव्हेंबर २०१५ मध्ये याची रिपोर्ट समोर आली. त्यानंतर २०१६ मध्ये शिफारसी मंजूर झाल्या. त्यानंतर १ जानेवारी २०१६ मध्ये ७वा वेतन आयोग लागू झाला.यानंतर समिती स्थापन करण्यापासून ते वेतन आयोग लागू होण्यापर्यंत जवळपास ३३ महिने म्हणजे २ वर्ष ९ महिने कालावधी लागला. त्यामुळे यावेळीदेखील तेवढाच वेळ लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन

Sangli : संपत्तीसाठी जन्मदात्या बापालाच काढले घराबाहेर; बहिणींनाही केली मारहाण, परस्पर विरोधी तक्रार दाखल

Crime News: मायलेकी जत्रेत जायला निघाल्या; आरोपीकडून विनयभंगाचा निषेध, विरोध केल्यावर चाकूने हल्ला

Vegetables Price Hike : भाजीपाल्याला महागाईची फोडणी, गवार- मटार २०० रुपयांवर; सर्वसामान्यांचे हाल | VIDEO

Maharashtra School: विद्यार्थ्यांविना शाळा! राज्यातील ३९४ शाळेत पटसंख्या शून्य, शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याचा क्रमांक अव्वल

SCROLL FOR NEXT