8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाची! आठव्या वेतन आयोगात बेसिक सॅलरी ₹५८,५०० होणार, वाचा सविस्तर

8th Pay Commission Salary Hike: आठवा वेतन आयोग लागू झाला आहे. दरम्यान, या नवीन वेतन आयोगाअंतर्गत पगारवाढ अजूनही झालेली नाही. दरम्यान, नवीन वेतन आयोगाअंतर्गत बेसिक सॅलरी ५८,५०० रुपये होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट

फिटमेंट फॅक्टर किती असणार?

बेसिक सॅलरी ५८,५०० रुपये होण्याची शक्यता

सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठवा वेतन आयोग लागू तर झाला आहे परंतु नवीन वेतन आयोगाअंतर्गत पगारवाढ येण्यास अजून उशिर होणार आहे. दरम्यान, आता या नवीन वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार आहे. कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीत वाढ होणार आहे. परिणामी त्यांचे इतर भत्तेदेखील वाढणार आहे. कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढतो हे जाणून घ्या.

आठव्या वेतन आयोगात पगार कितीने वाढणार? (8th Pay Commission Salary Hike Details)

आठव्या वेतन आयोगाअंतर्गत पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून आहे. फिटमेंट फॅक्टर जास्त असेल तर कर्मचाऱ्यांचा पगार जास्त वाढेल. दरम्यान, आठव्या वेतन आयोगाअंतर्गत शिफारसी लागू करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीने शिफारसी सादर केल्यानंतर केंद्र सरकारची मंजुरी मिळणार आहे. त्यानंतर पगारवाढ केली जाणार आहे.

फिटमेंट फॅक्टर किती असेल? (8th Pay Commission Fitment Factor)

आठव्या वेतन आयोगाअंतर्गत फिटमेंट फॅक्टर किती असेल त्यावर अनेक चर्चा होत आहेत. दरम्यान, फिटमेंट फॅक्टर २.० ते ३.२५ च्या मध्ये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत समोर आलेली नाही. दरम्यान, सध्या बेसिक सॅलरी ही १८,००० रुपये आहे. जर फिटमेंट फॅक्टर २.० झाला तर बेसिक सॅलरी ३६,००० रुपये होईल. फिटमेंट फॅक्टर ३.० झाला तर सॅलरी ५४,००० रुपये होईल. जर फिटमेंट फॅक्टर ३.२५ झाला तर पगार ५८,५०० रुपये होऊ शकतो.

सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता. यामुळे बेसिक सॅलरी ७००० रुपयांवरुन थेट १८,००० रुपये झाली होती. त्यामुळे यावेळी फिटमेंट फॅक्टर किती असणार आणि पगार कितीने वाढणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT