8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; महागाई भत्त्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता

8th Pay Commission Salary Hike Update: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारी कर्मचारी संघटनांनी महत्त्वाची मागणी केली आहे. बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता एकत्र करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

महागाई भत्ता अन् बेसिक सॅलरी एकत्र करण्याची मागणी

कर्मचारी संघटनांनी केली मागणी

केंद्र सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठव्या वेतन आयोगासाठी शिफारसी तयार केल्या जात आहेत. यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या बैठका सरु आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांची संघटनांची बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता एकत्र करण्याची मागणी केली जात आहे.

महागाई भत्ता बेसिक सॅलरीत जोडण्याची मागणी (DA and Basic Salary Merger)

महागाई भत्ता हा बेसिक सॅलरीत जोडून देण्याची मागणी केली जात आहे.संघटनांच्या म्हणण्यांनुसार, घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता, निवृत्तीवेतन आणि वेतनवाढ असे अनेक घटक मूळ वेतनाशी जोडले गेले आहे. त्यामुळे महागाई भत्तादेखील मूळ पगारात जोडला गेला तर वेतन रचनेत चांगली वाढ होईल. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून महागाई खूप जास्त वाढत आहे. त्यामुळे बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता एक करणे गरजेचे आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागणीमागचे मुख्य कारण म्हणजे महागाईत झालेली वाढ. सध्या ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत महागाई भत्ता ५८ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. महागाई वाढत असल्यानेच लोकांना खूप अडचणी येत आहेत.

फॅमिली युनिट वाढवण्याची मागणी

फेडरेशनच्या मते, सातव्या वेतन आयोगात बेसिक सॅलरी १८,००० रुपये आहे. जी तीन फॅमिली युनिटसाठी आहे. फेडरेशनच्या मते, नवीन फॅमिली युनिट ५ सदस्यांसाठी असावे. याअंतर्गत ६०००x ५ फॅमिली युनिट म्हणजे ३०,००० रुपये. त्यात सध्याचा ६० टक्के महागाई भत्ता जोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे हा आकडा ४७,४०० रुपये असेल. वाढती महागाई लक्षात घेता फॅमिली युनिट ५ करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जुन्नरमधील मुक्ताई माता मंदिरात चोरी करणाऱ्या टोळीला अटक

Heart Attack: सावधान! हार्ट अटॅक येण्याआधी फक्त छातीत वेदना होत नाहीत; डॉक्टरांनी सांगितली ५ लक्षणे

Solapur : सोलापुरात भल्या पहाटे दरोडा; चोरट्यांनी ATM मशीन पळवलं, संपूर्ण शहरात खळबळ

Kidney Damage Symptom: शरीरात दिसणारी ही 6 लक्षणं सांगतात तुमची किडनी निकामी होतेय

Pooja Sawant: अधीर मन झाले...; ऑफ व्हाईट साडीत पूजा सावंतचा मराठमोळा लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT