8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! आठव्या वेतन आयोगाबाबत या दिवशी मोठा निर्णय होण्याची शक्यता

8th Pay Commission Salary Hike Update: आठव्या वेतन आयोगाबाबत लवकरच महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. कर्मचारी संघटनांची १३ आणि १४ मे रोजी बैठक होणार आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची माहिती

१३ आणि १४ मे रोजी होणार महत्त्वाची बैठक

पगारवाढीबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

केंद्रीय कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठव्या वेतन आयोगाबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. रक्षा मंत्रालय आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आयोगाने या सर्व कर्मचारी संघटना, यूनियन आणि पेन्शनधारकांची बैठक बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. ही बैठक १३ आणि १४ मे रोजी दिल्लीत आयोजित केली आहे. यामध्ये वेतन, पेन्शन आणि भत्त्यांमधील मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, या बैठकीत कर्मचारी संघटना बेसिक सॅलरी वाढवण्याची, फिटमेंट फॅक्टरबाबत निर्णय, महागाई भत्ता, प्रमोशनल इंक्रिमें आणि पेन्शनबाबतच्या मागण्या ठेवल्या जाणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मे २०२६

बैठकीत सहभागी होण्यासाठी कर्मचारी संघटनांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. आयोगाने सांगितले आहे की, संघटना आणि युनियनने अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. याची शेवटची तारीख १० मे २०२६ आहे. यासाठी मेमो आयडी देणे गरजेचे आहे. यानंतरच बैठकीत फक्त विहित प्रक्रिया पूर्ण केलेल्या संघटनांनाच सभेला उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाईल.

अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी

आयोगाने संकेत दिले की, भविष्यात दिल्लीत बैठका आयोजित केल्या जातील. या बैठकांची माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. ही बैठक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे मागण्या थेट आयोगासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. आता आठव्या आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी दिला आहे. त्यानंतर शिफारसी लागू होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT