8th Pay Commission saam tv
बिझनेस

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगात मोठा ट्विस्ट! कोणाचा पगार होणार ₹65,000 अन् कोणाचा ₹52,600?

8th CPC Salary Hike: आठव्या वेतन आयोगासाठी MSA आणि IRTSA यांनी दोन वेगवेगळे फिटमेंट फॅक्टर प्रस्तावित केले आहेत.

Sakshi Sunil Jadhav

आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू असताना केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नवीन वेतनरचनेत कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी किती वाढणार, याबद्दल दोन कर्मचारी संघटनांनी वेगवेगळे प्रस्ताव मांडले आहेत. एका प्रस्तावानुसार, सध्या १८००० बेसिक सॅलरी असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार ६५,००० होऊ शकतो, तर दुसऱ्या प्रस्तावानुसार तो ५२,६०० पर्यंत जाऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे, याचा फायदा कनिष्ठ आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो.

दोन संघटनांचे दोन वेगवेगळे फॉर्म्युले

आठव्या वेतन आयोगासाठी Ministerial Staff Association (MSA) आणि Indian Railways Technical Supervisors Association (IRTSA) यांनी वेगवेगळे फिटमेंट फॅक्टर सुचवले. फिटमेंट फॅक्टर म्हणजे सध्याच्या बेसिक सॅलरीला गुणून नवीन बेसिक पगार ठरवण्याचा आकडा असतो.

MSA ने सर्व वेतन स्तरांसाठी ३.६१ हा समान फिटमेंट फ‌ॅक्टर लागू करण्याची मागणी केली. तर IRTSA ने वेगवेगळ्या वेतन स्तरांसाठी वेगवेगळे फिटमेंट फॅक्टर सुचवले आहेत. हा फॅक्टर लेव्हल १ साठी २.९२ असून लेव्हल १७ आणि १८ साठी ४.३८ पर्यंत आहे.

कनिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी कोणता फॉर्म्युला फायदेशीर?

सध्या सातव्या वेतन आयोगानुसार लेव्हल १ कर्मचाऱ्यांची किमान बेसिक सॅलरी १८००० आहे. MSA च्या प्रस्तावानुसार ती वाढून जवळपास ६५,००० होऊ शकते. तर IRTSA च्या फॉर्म्युल्यानुसार ती ५२,६०० पर्यंत जाऊ शकते. म्हणजे दोन्ही प्रस्तावांमध्ये तब्बल १२,४०० चा फरक आहे.

लेव्हल ६ मध्येही MSA चा प्रस्ताव थोडा फायदेशीर दिसतो. या स्तरावर MSA नुसार बेसिक १,२७,८००, तर IRTSA नुसार १,२३,९०० होऊ शकते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना IRTSA चा जास्त फायदा?

उच्च वेतन स्तरांवर मात्र चित्र बदलतं. लेव्हल १२ मध्ये IRTSA च्या प्रस्तावानुसार बेसिक सॅलरी २,९९,५०० पर्यंत जाऊ शकतो.

तर लेव्हल १८ मध्ये सध्या २.५० लाख जास्त असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार MSA च्या फॉर्म्युल्यानुसार जवळपास ९.०२ लाख आणि IRTSA च्या फॉर्म्युल्यानुसार १०.९५ लाख होऊ शकतो.

कनिष्ठ आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांमधील अंतर वाढणार?

MSA च्या समान फिटमेंट फॅक्टरमुळे सर्व स्तरांमध्ये सध्याचं वेतन गुणोत्तर १:१३.९ इतकंच राहण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे, IRTSA च्या प्रस्तावामुळे हे अंतर वाढून १:२०.८ होऊ शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart-Morning Walk : सकाळी दाट धुक्यात मॉर्निंग वॉक केल्याने हृदयविकारांचा धोका? चालण्यापूर्वी वाचा योग्य वेळ कोणती

Paneer Biryani Recipe: घरी बनवा हॉटेलसारखी चविष्ट आणि मसालेदार पनीर बिर्याणी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: अतिक्रमणानंतर पुणे महापालिका आयुक्तांचा मोर्चा अनधिकृत फ्लेक्सवर

Milk Storage Tips: दूध फ्रिजमध्ये ठेवूनही लवकर खराब होतंय? फ्रिजमधील 'ही' जागा ठरू शकते कारण; नेमकं कुठे ठेवावं दूध?

Jacket Blouse Designs : थंडीतही दिसा स्टायलिश! साडीसोबत ट्राय करा जॅकेट स्टाइल ब्लाऊजच्या 'या' ६ डिझाइन्स

SCROLL FOR NEXT