8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांना मिळणार लाखो रुपये; वाचा एरियरचं कॅल्क्युलेशन

8th Pay Commission Salary Hike: आठवा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू झाला आहे.दरम्यान, अजून पगारवाढ येण्यास वेळ लागणार आहे. तेवढ्या कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना एरियर दिला जाणार आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बातमी

जानेवारीपासून वेतन आयोग लागू

एरियरमधून मिळणार लाखो रुपये

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू झाला आहे. आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे.आठव्या वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू झाला आहे. तरी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव पगार येण्यास अजून काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, जेवढे महिने उशिरा पैसे येणार त्या महिन्याचा एरियर कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार आता समिती शिफारसी तयार करतील. यासाठी १८ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, नवीन पगारवाढ कधीपासून लागू होणार याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही,

लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा

देशात दर १० वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो. सातवा वेतन आयोग २०१६ मध्ये लागू झाला होता. त्याआधी १० वर्षांपूर्वी सहावा वेतन आयोग लागू झाला होता. यानंतर आता पगारवाढ कधी येणार याकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. या नवीन आठव्या वेतन आयोगामुळे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

कर्मचाऱ्यांना मिळणार लाखो रुपये

नवीन वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरनुसार पगार वाढणार आहे. जर तुमचा आताचा पगार ४०,००० रुपये असेल तर आठव्या वेतन आयोगानुसार पगार ५०,००० रुपये होऊ शकतो. याचाच अर्थ असा की महिन्याला तुमचे १०,००० रुपये वाढतील. दरम्यान, जर हा नवीन वेतन आयोग मे २०२७ मध्ये लागू झाला तर १५ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. दर महिन्याला जर १५ महिन्यांचा कालावधी लागला तर तुम्हाला १,५०,००० रुपये मिळणार आहेत.जवळपास दीड लाख रुपये मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT