8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: २५ हजारांची पेन्शन थेट ८७,५०० रुपये होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत आतापर्यंतची मोठी अपडेट

8th Pay Commission: ८व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. २५ हजारांची पेन्शन ८७,५०० रुपये होणार का? फिटमेंट फॅक्टर आणि महागाई भत्त्याबाबत जाणून घ्या.

Shruti Vilas Kadam

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ८व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची चर्चा सुरू आहे. या आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही वाढ होऊ शकते. त्यामुळे सध्या नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांचेही लक्ष ८व्या वेतन आयोगाकडे लागले आहे. काही अहवालांनुसार, सध्या २५ हजार रुपये पेन्शन मिळणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढून ८७,५०० रुपये होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अहवाल आल्यानंतरच सरकार निर्णय घेणार

८व्या वेतन आयोगाकडून सध्या कर्मचारी संघटनांशी चर्चा केली जात आहे. या चर्चेत कर्मचाऱ्यांचा पगार, महागाई भत्ता आणि पेन्शनमध्ये किती वाढ करावी, याबाबत वेगवेगळ्या मागण्या मांडल्या जात आहेत. ऑक्टोबर महिन्यात आयोगाच्या पथकाने मुंबईला भेट दिली होती. याआधी १० ऑगस्ट रोजी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले होते की, आयोगाने अद्याप आपला अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे पगार किती वाढणार, पेन्शनमध्ये किती वाढ होणार आणि नवीन वेतन कधीपासून लागू होणार, याबाबत अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

३.८३ फिटमेंट फॅक्टरची मागणी काय आहे?

८व्या वेतन आयोगासमोर कर्मचारी संघटनांनी काही महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या आहेत. यामध्ये किमान मूळ पगार ६९ हजार रुपये करावा आणि ३.८३३ फिटमेंट फॅक्टर लागू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आता फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय? हे सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, सध्याचा मूळ पगार किती पटीने वाढवायचा, हे फिटमेंट फॅक्टर ठरवतो. त्यामुळे फिटमेंट फॅक्टर जितका जास्त असेल, तितकी मूळ पगारातील वाढ जास्त होऊ शकते. सध्या २.५७, २.८६, ३.०० आणि ३.१५ अशा वेगवेगळ्या आकड्यांची चर्चा सुरू आहे. मात्र, सरकारने अद्याप कोणताही फिटमेंट फॅक्टर निश्चित केलेला नाही.

२५ हजारांची पेन्शन ८७,५०० रुपये कशी होणार?

सध्या पेन्शनधारकांमध्ये २५ हजार रुपयांची पेन्शन वाढून ८७,५०० रुपये होणार का, याची चर्चा सुरू आहे. काही अहवालांमध्ये ३.५ फिटमेंट फॅक्टरच्या आधारे हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजेच २५ हजार रुपये मूळ पेन्शन असलेल्या व्यक्तीला ३.५ फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास ८७,५०० रुपये मिळू शकतात. मात्र, ही केवळ संभाव्य वाढ आहे. सरकारने अद्याप याला मंजुरी दिलेली नाही.

महागाई भत्त्यातही वाढ होणार?

८व्या वेतन आयोगासमोर महागाई भत्ता म्हणजेच DA वाढवण्याबाबतही मागण्या करण्यात येत आहेत. सध्या वाढत्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांचा खर्च वाढत आहे. त्यामुळे पगारासोबत महागाई भत्त्यातही योग्य वाढ करावी, अशी कर्मचारी संघटनांची मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऊसदर आंदोलनाचा ट्रक चालकांना मोठा फटका, २० रुपयांची पाण्याची बाटली ५० रुपयांना

SDRF boats capsize: मोठी दुर्घटना! मच्छीमारांना वाचवण्यासाठी गेलेल्या SDRF च्या दोन बोटी उलटल्या; १० जवान बेपत्ता

Ramayana Movie Review : रामाची मर्यादा, रावणाचा अहंकार अन् सीतेची शक्ती; रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला?

PWD Scam: कार्यकारी अभियंत्यासह ३ जणांना अटक, सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ

Silent Health Warning: सकाळी उठताच थकवा आणि पोट फुगल्यासारखे वाटतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'हा' आजार

SCROLL FOR NEXT