8th Pay Commission Big Update  meta ai
बिझनेस

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग रखडला तर कर्मचाऱ्यांना लाखोंचा फटका? ₹3.32 लाखांचं संपूर्ण गणित पाहा

Government Employees : आठव्या वेतन आयोगाच्य अंमलबजावणीला उशीर झाल्यावर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीवर परिणाम होऊ शकतो. लेव्हल ७ कर्मचाऱ्यांच्या उदाहरणातून बेसिक, HRA आणि संभाव्. आर्थिक फरकाचे संपूर्ण गणित जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

देशातल्या ५० लाखांपेक्षा जास्त केंद्रीय सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहतायेत. आयोगाने ठरलेल्या कालावधीत म्हणजेच १८ महिन्यांमध्ये आपला अहवाल सादर करणं अपेक्षित आहे. मात्र, अहवाल आल्यानंतर त्याची समीक्षा, सरकारी निर्णय आणि अधिसूचना जारी करण्याच्या प्रोसेसला आणखी काही महिने लागू शकतात. त्यामुळे अंमलबजावणीला उशीर झाल्याने कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वाढीव भत्त्यांवर परिणाम होऊ शकतो.

आठव्या वेतन आयोगाचा सुधारित मूलभूत पगार १ जानेवारी २०२६ पासून लागू मानला जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अधिसूचना निघायला उशीर झाल्यावर या कालावधीचा एरियर मिळण्याची चर्चा आहे. मात्र,मागच्या वेतन आयोगांच्या पद्धतीनुसार एरियर प्रामुख्याने बेसिक सॅलरिवर मिळतो. आठव्या वेतन आयोगाचा सुधारित मूलभूत पगार १ जानेवारी २०२६ पासून लागू मानला जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अधिसूचना निघायला उशीर झाल्यावर या DA, HRA आणि ट्रान्सपोर्ट अलाउन्ससारख्या भत्त्यांवर थेट एरियर मिळत नाही.

लेव्हल-७ कर्मचाऱ्यांचे किती नुकसान होऊ शकते?

उदाहरणार्थ, लेव्हल-७ कर्मचाऱ्याचा सध्याचा बेसिक पगार ₹४४,९०० आहे. २.१ फिटमेंट फॅक्टर गृहीत धरल्यावर सुधारित बेसिक पगार सुमारे ₹९४,२९० होऊ शकतो. म्हणजेच बेसिकमध्ये अंदाजे ₹४९,३९० ची वाढ होऊ शकते.

सध्याच्या २४ टक्के HRA दरानुसार ₹४४,९०० बेसिकवर HRA ₹१०,७७६ होते. २.१ फिटमेंट फॅक्टरनंतर ते अंदाजे ₹२२,६३० होऊ शकते. त्याचप्रमाणे ३,६०० चा TPTA अंदाजे ₹७५६० होण्याचे गृहीतक आहे.

जर आठवा वेतन आयोग मे २०२७, ऑगस्ट २०२७ किंवा जानेवारी २०२८ मध्ये लागू झाला, तर अनुक्रमे १७, २० किंवा २५ महिन्यांच्या उशीराचा परिणाम होऊ शकतो. उपलब्ध अंदाजानुसार, अशा विलंबामुळे कर्मचाऱ्यांना भत्त्यांच्या संभाव्य वाढीपासून मोठी रक्कम गमवावी लागू शकते आणि काही गणनांमध्ये हा फरक सुमारे ₹३.३२ लाखांपर्यंत जाऊ शकतो.

मात्र, हे सर्व आकडे अंदाजांवर आधारित आहेत. आठवा वेतन आयोगाचा अंतिम फिटमेंट फॅक्टर, नवीन वेतनश्रेणी, HRA-TPTA दर आणि सरकारची अधिसूचना जारी होण्याची तारीख निश्चित झाल्यानंतरच प्रत्यक्ष आर्थिक परिणाम स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Cholesterol: नसांमधील कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल; फक्त सकाळच्या नाश्त्यात या 6 पदार्थांचा करा समावेश

Morning Water Benefits: सकाळी झोपेतून उठल्यानंतर लगेच किती ग्लास पाणी प्यावं आणि का? शरीरात होतील हे ३ जादुई बदल

Abhijeet Dipke: चहा प्यायला चला म्हणत थेट पोलिस ठाण्यात नेलं, अभिजीत दीपकेंना अटकेचा प्रयत्न; VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: शरद पवार आज दुष्काळी तालुक्याचा दौरा करणार, पुरंदरमधील शेतकऱ्यांना भेटणार

Rose Water Bath Benefits: गुलाबपाण्याने आंघोळ केल्याने शरीराला होतात 5 आश्चर्यकारक फायदे, त्वचा होईल आतून स्वच्छ

SCROLL FOR NEXT