8th Pay Commission salary hike google
बिझनेस

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

8th Pay Commission Salary Hike: कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरित मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच फिटमेंट फॅक्टर वाढण्याची शक्यता आहे. जर मागण्या स्विकारल्या तर कर्मचाऱ्यांची चांदी होणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसांपासून सुरु असलेल्या आठव्या वेतन आयोगाच्या चर्चेत एक आनंदाची बातमी हाती आली आहे. आयोगाकडे आत्तापर्यंत बऱ्याच मागण्या केल्या त्याची शेवटची तारीख ही १५ जून होती. त्यानंतर आयोग मागण्या विचारात घेणार नव्हतं. ही आठव्या वेतन आयोगाची सगळ्यात महत्वाची आणि पहिली पायरी होती. आता कर्मचार्‍यांनी आणि पेन्शनधारकांनी केलेल्या मागण्या पूर्ण होतील का याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

कर्मचारी संघटनेने ज्या मागण्या केल्यात त्यामध्ये बेसिक सॅलरीत वाढ, DA च्या बेसिक पगारात वाढ आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ अशा मागण्या केल्या गेल्या आहेत. यात सर्वात महत्वाचा फिटमेंट फॅक्टर आहे. ज्या प्रमाणे महागाई वाढतेय. त्यानुसार फिटमेंट फॅक्टरमध्येही वाढ व्हायला हवी अशा कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.

आता फिटमेंट फॅक्टर हा २.५७ आहे. यामध्ये जर छोटा बदल जरी केला तरी कर्मचारी मालामाल होऊ शकतात. कर्मचाऱ्यांची मागणी आहे फिटमेंट फॅक्टर ३.८३ इतका झाला पाहिजे. जर ही मागणी स्विकारली तर तुमच्या बेसिक सॅलरीत वाढ होईल.

फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor)हा आत्तापर्यंत बऱ्याच कारणांमुळे बदलला गेला आहे. सातव्या वेतन आयोगात फिटमेंट १.८६ ठेवला होता. तेव्हा ७००० रूपयांच्या बेसिक सॅलरीत वाढ होऊन ती १८००० रुपये करण्यात आली. त्याप्रमाणे दर सरकारने ३.८३ फिटमेंट फॅक्टर केला तर तुमचं मुळे वेतन ६८,९४० पर्यंत वाढेल. म्हणजे १८००० रूपयांमध्ये ५१,००० रुपयांची वाढ होईल. पण आत्तापर्यंत अशी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरात सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्यांना १५ हजारांची मदत; ७० लाख तरुणांना फायदा मिळवून देणारी 'PM-VBRY' योजना काय आहे?

Kidney Health: ही 5 मोठी लक्षणं दिसली तर समजा तुमची किडनी खराब होतेय!

फुटीर खासदारांसोबत बैठक कुठे झाली? 'ऑपरेशन टायगर'मागे कुणाची रणनीती? पहिला फोटो आला समोर

Famous Director Death : हरहुन्नरी कलाकार हरपला; प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, टिव्ही इंडस्ट्रीवर शोककळा

SCROLL FOR NEXT