8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? पगार कितीने वाढणार? वाचा सविस्तर

8th Pay Commission Salary Hike Expectation: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, हा वेतन आयोग लागू होण्यास अजून उशीर होऊ शकतो.

Siddhi Hande

सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. आठव्या वेतन आयोगाची घोषणा जानेवारी महिन्यात झाली होती. त्यानंतर आता हा आठवा वेतन आयोग कधी लागू होणार याची कोट्यवधी कर्मचारी वाट पाहत आहे. दरम्यान, आठव्या वेतन आयोगाची समिती आणि टर्म्स ऑफ रेफरंस अजून बाकी आहे.

कधी होणार आठवा वेतन आयोग लागू? (When Will 8th Pay Commission Implemented)

Ambit च्या रिपोर्टनुसार, आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी २०२५ च्या शेवटपर्यंत जाहीर केली जाऊ शकते. जानेवारी २०२५ मध्ये हा आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अंतिम निर्णय हा रिपोर्ट आल्यानंतर आणि सरकारने मंजुरी दिल्यानंतरच होणार आहे.

रिपोर्टनुसार, आयोगाची शिफारशी २०२७ मध्ये लागू झाली झाली तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये ३० ते ३४ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

फिटमेंट फॅक्टर किती होणार? (Fitment Factor)

अजूनपर्यंत आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन केली नाही. परंतु तज्ज्ञांच्या मते, यावेळी फिटमेंट पॅक्टर १.८३ ते २.४६ होऊ शकतो.यावर आधारित कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार हे ठरवले जाते.

पगार किती वाढणार? (How Much Salary Increase Under 8th Pay Commission)

सध्या बेसिक सॅलरी १८००० रुपये आहे. जर फिटमेंट फॅक्टर २.० झाला तर रिवाइज्ड सॅलरी ३६००० रुपये होईल. याशिवाय महागाई भत्ता, एचआरए असे भत्तेदेखील मिळतील. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगलीच वाढ होणार आहे. दरम्यान, हा वेतन आयोग लागू होण्यास अजून उशिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT