केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नवीन वेतन आयोगामुळे बेसिक सॅलरीमध्ये किती वाढ होणार, फिटमेंट फॅक्टर किती असेल आणि हातात येणारा पगार किती वाढेल, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. काही चर्चांमध्ये फिटमेंट फॅक्टर २.१ असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण सरकारकडून अजून अंतिम फिटमेंट जाहीर झालेला नाही.
सध्या सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरीत १८,००० रुपये आहे. उदाहरणार्थ, आठव्या वेतन आयोगात २.१ फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर १८,००० रुपयांना २.१ ने गुणल्यावर नवीन बेसिक सॅलरी ३७,८०० रुपये होते. म्हणजेच बेसिक पे हा ३८ हजार रुपये होऊ शकतो. पण हा फक्त अंदाज असून अंतिम वेतनरचना आयोगाच्या शिफारशी आणि सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहेत.
सातव्या वेतन आयोगात २.५७ फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता. तेव्हा बेसिक सॅलरी ७,००० रुपयांवरून १८,००० रुपये करण्यात आली. पण त्या काळातल्या महागाई भत्ता विचारात घेतला की, प्रत्यक्ष वाढ फक्त फिटमेंट फॅक्टरच्या आकड्यावरून ठरवता येत नाही.
सध्याच्या १८,००० रुपये मूळ वेतनावर ५८ टक्के DA असं आपण गृहीत धरलं तर १०,४४० रुपये महागाई भत्ता मिळतो. त्यामुळे बेसिक सॅलरी आणि DA मिळून एकूण रक्कम २८,४४० रुपये होते. नवीन बेसिक सॅलरी ३७,८०० रुपये झाली तर जुन्या बेसिक सॅलरीसोबत DA मिळून होणाऱ्या रकमेच्या तुलनेत ९,३६० रुपयांचा फरक दिसतो. हा अहवाल २०२७ च्या आसपास येण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.