8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचार्‍यांच्या कामाची बातमी! बेसिक सॅलरी ₹१८००० वरुन ४४,२८० होण्याची शक्यता

8th Pay Commission Salary Hike: आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, नवीन वेतन आयोगात बेसिक सॅलरी १८००० रुपयांवरुन ४४,२८० होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार?

आठव्या वेतन आयोगात पगार कितीने वाढणार?

पगार १८००० रुपयांवरुन ४४,२८० होण्याची शक्यता

सरकारी कर्मचारी ८व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठवा वेतन आयोग लवकरच लागू होणार आहे. यासाठी सरकारने टर्म्स ऑफ रेफरन्सदेखील जारी केले आहेत. दरम्यान, या नवीन वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार, फिटमेंट फॅक्टर किती असणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडलेला आहे. कर्मचाऱ्यांचा पगार हा फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असतो.

फिटमेंट फॅक्टर नक्की आहे तरी काय? (What is Fitment Factor)

फिटमेंट फॅक्टरच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांचा नवीन पगार ठरवला जातो. यामुळे कर्मचाऱ्यांची जुनी बेसिक सॅलरी बदलली जाते. सातव्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर २.५७ होता. त्यामुळे त्याआधीच्या जुन्या बेसिक सॅलरीला २.५७ने गुणून नवीन बेसिक सॅलरी ठरवली होती. आता या नवीन वेतन आयोगात पगार किती होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

कसा ठरवला जातो फिटमेंट फॅक्टर?

फिटमेंट फॅक्टर हा महागाई, लाइफस्टाइलचा खर्च, कुटुंबाच्या सामान्य गरजा यावर ठरवला जातो. यामध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टी, घरभाडे या सर्व गोष्टींचा विचार केला जातो.

कितीने वाढणार फिटमेंट फॅक्टर?

वित्तीय फर्म एम्बिट कॅपिटलच्या रिपोर्टनुसार फिटमेंट फॅक्टर हा १.८३ ते २.४६ पर्यंत वाढू शकतो. सध्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी १८००० आहे. जर फिटमेंट फॅक्टर १.८३ झाला तर हा पगार ३२,९४० होऊ शकतो. जर फिटमेंट फॅक्टर २.४६ झाला तर पगार ४४,२८० होऊ शकतो.

बेसिक सॅलरीत १४ ते ५४ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ५४ टक्के पगारवाढ होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सरकारवर अतिरिक्त ताण पडू शकतो. परंतु यामध्ये पगार वाढू शकतो.

आठव्या वेतन आयोगात १.९२ ते २.५७ पर्यंत फिटमेंट फॅक्टर होऊ शकतो. यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या ग्रेडनुसार वाढणार आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: कोचकडून महिला खेळाडूवर बलात्कार, हॉटेलवर सरावासाठी बोलावलं अन्...; करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी

'V' Neck ब्लाउजची क्रेझ; साडीला देईल रॉयल लूक, पाहा ट्रेंडी डिझाइन्स

Maharashtra Live News Update: हिंगोलीच्या औंढा शहरात गटविकास अधिकाऱ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड

Viral Video : एकमेकींचे केस ओढले, रस्त्यात राडा घातला; प्रचाराचे पैसे न मिळाल्याने महिलांची फ्री स्टाईल हाणामारी

Navi Mumbai : नवी मुंबईच्या लॉजमध्ये नको ते उद्योग, पोलिसांनी उद्ध्वस्त केले देहविक्रीचं रॅकेट; ७ महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT