8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज! आठव्या वेतन आयोगात मिळणार ९ लाखांपर्यंत एरियर; वाचा सविस्तर

8th Pay Commission Arrears: आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी तयार होण्यासाठी अजून वेळ आहे. शिफारसी मंजुर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात पगार मिळेल. या कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना एरियर मिळणार आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

१८ ते २४ महिन्यात लागू होणार नवीन वेतन आयोग

एरियर किती मिळणार?

केंद्र सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. यासाठी समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. समिती स्थापन झाल्यानंतर शिफारसी तयार केल्या जातील. शिफारसींना मंजुरी मिळाल्यानंतर आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होईल. दरम्यान, आठव्या वेतन आयोगासाठी शिफारसी येण्यासाठी एका वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू शकतात. या कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना एरियर मिळणार आहे.

आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी फिटमेंट फॅक्टरच्या फॉर्म्युलानुसार लागू होण्याची शक्यता आहे. या शिफारसी जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. त्यामुळे त्यावेळेपासून कर्मचाऱ्यांना एरियर मिळणार आहे. १८ ते २४ महिन्यांच्या कालावधीसाठी एरियर मिळू शकतो. दरम्यान, एरियर किती मिळणार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

लाखो रुपयांचा एरियर मिळणार

लेवल १ ते लेवल पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांचा एरियर मिळणार आहे. जर २० महिन्यांचा एरियर धरला तर किती पैसे मिळणार हे जाणून घ्या. एरियर फिटमेंट फॅक्टर २.०,२.१५,२.१८ आणि २.५७ असण्याची शक्यता आहे.

९ लाखांपेक्षा जास्त एरियर

सातव्या वेतन आयोगात लेवल १ कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी १८,००० रुपये आहे. लेव्हल ५ कर्मचाऱ्यांच सॅलरी २९,२०० रुपये आहे. आठव्या वेतन आयोगात २० महिन्यांचा एरियर ३.६० लाख ते ९.१७ लाख रुपये मिळू शकतात.हे कॅल्क्युलेशन फिटमेंट फॅक्टर २.०, २.१५, २.२८ आणि २.२७ असू शकतो. या आधारावर तुम्हाला एरियर मिळणार आहे.

सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर लागू केल्यानंतर बेसिक सॅलरी दिली जाते. यामध्ये जुनी सॅलरी आणि नवीन सॅलरीमधील वाढलेली रक्कम काढली जाते. ही रक्कम जेवढे महिने तेवढ्या महिन्यात गुणली जाते. त्यानंतर तो एरियर दिला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Rings Designs : हातांच्या सौंदर्यात पडेल भर! घागरा चोळीवर खुलून दिसतील 'या' ७ स्टायलिश रिंग्स

Hair Care: केस लगेच फ्रिझी होतात? मग वापरा या ७ सोप्या टिप्स; केस होतील मऊ, मुलायम आणि चमकदार

Maharashtra News Live Update : महायुतीत एकनाथ शिंदे पुन्हा नाराज

DA Hike Calculation: DA वर आयकर लागतो का? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Property News: अनधिकृत बांधकामांवर फडणवीस सरकारचा मोठा प्रहार; घेतला मोठा निर्णय, नियम मोडणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई

SCROLL FOR NEXT