जुलै महिना संपायला शेवटचे २ दिवस उरलेले आहेत. १ ऑगस्ट २०२६ पासून अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चावर, बँकिंग व्यवहारांवर, टॅक्स भरण्यावर आणि प्रवासावर होऊ शकतो. त्यामुळे हे बदल आधीच जाणून घेणे आवश्यक आहे.
१ ऑगस्टपासून भारतीय रेल्वेने तत्काळ (Tatkal) तिकीट बुकिंग प्रक्रियेत बदल केला आहे. नवीन नियमानुसार टोकन देण्याची वेळ आणि तिकीट बुकिंग सुरू होण्याची वेळ एकाच वेळी ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे आरक्षण केंद्रांवरची गर्दी कमी होईल आणि प्रवाशांना तिकीट बुक करणं जास्त सोपं होईल.
आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ITR-1 आणि ITR-2 भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२६ होती. या तारखेपर्यंत आयकर विवरणपत्र (ITR) दाखल न करणाऱ्यांना आता Penalty भरावी लागू शकते. तसेच काही टॅक्स सवलतींचा लाभही मर्यादित होऊ शकतो. पण Penalty ITR-3 आणि ITR-4 साठी शेवटी मुदत वेगवेगळ्या श्रेणीनुसार पुढे आहे.
१ ऑगस्टपासून काही बँका क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंट्सस शुल्क आणि इतर सुविधांमध्ये बदल करू शकतात. तसेच काही बँका फिक्स्ड डिपॉझिट (FD) वरच्या व्याजदरातही बदल करण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आगामी पतधोरण बैठकीतल्या निर्णयांचा परिणाम कर्जाच्या EMI आणि FD व्याजदरांवर होऊ शकतो.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतात. त्यामुळे १ ऑगस्टपासून LPG दरात बदल होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम घरगुती बजेटवर होऊ शकतो.
नवीन नियमांची माहिती वेळेवर असल्यावर अनावश्यक दंड, जास्तीची फी किंवा अडचणी टाळता येतात. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच बँक, रेल्वे आणि इतर संबंधित विभागांकडून जारी होणाऱ्या अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवणं नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.