Financial Deadline In December Saam Tv
बिझनेस

Financial Deadline In December : 31 डिसेंबरपूर्वी ही महत्त्वाची ७ कामे पूर्ण करा, अन्यथा होईल मोठं नुकसान

31st December 2023 Financial Deadline Last Date : वर्षातला हा शेवटचा महिना. वर्ष संपण्यापूर्वी काही महत्त्वाची कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. असे न केल्यास तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. ३१ डिसेंबरपर्यंत काही आर्थिक कामे लवकरात लवकर पूर्ण करा.

कोमल दामुद्रे

Financial Deadline :

वर्षातला हा शेवटचा महिना. वर्ष संपण्यापूर्वी काही महत्त्वाची कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. असे न केल्यास तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. ३१ डिसेंबरपर्यंत काही आर्थिक कामे लवकरात लवकर पूर्ण करा.

ऑनलाइन पेमेंट करण्यापासून ते बँकेशी संबंधित कामांपर्यंत अनेक कामे आहेत जी वेळेवर पूर्ण करायला हवी. ती कामे कोणती आहेत. ते जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. बँक ऑफ बडोदा फेस्टिव्हल ऑफर

बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांसाठी फेस्टिव्हल ऑफर (Offer) देत आहे. त्याचे नाव आहे बीओबी के संग फेस्टिव्हल की उमंग. ज्याचा लाभ ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत घेता येईल. यामध्ये बँक ग्राहकांना अतिशय आकर्षक व्याजदरात कर्ज (Loan) सुविधा देत आहे. ऑफरअंतर्गत तुम्ही कार लोन, होम लोन, एज्युकेशन लोन आणि पर्सनल लोनवर सणासुदीच्या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

2. SBI अमृत कलश योजना

स्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैंकी (Bank) एक आहे. परंतु, यामध्ये अनेक योजना ऑफर करते. त्यापैकी एक अमृत कलश योजना आहे. एसबीआयची ही योजना मुदत ठेवींसाठी उपलब्ध आहे. SBI ची अमृत कलश योजना ७.१० टक्के व्याजदराचा लाभ देते. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची संधी ३१ डिसेंबर २०२३ आहे.

3. आधार अपडेट अंतिम मुदत

युनिक आयडेंटिफेकशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)च्या अधिकृत वेबसाइटनुसार गेल्या १० वर्षात आधार कार्डची माहिती अपेडट केली गेली नसेल, तर १४ डिसेंबरपर्यंत ते मोफतची सुविधा दिली जाते आहे. यानंतर तुम्हाला शुल्क भरावे लागू शकते.

4. बँक लॉकर करार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना ३० डिसेंबर २०२३ पूर्वी बँक लॉकर्ससाठी नवीन करारावर स्वाक्षरी करण्याचे निर्देश दिले आहेत. असे न केल्यास ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.

5. SBI गृहकर्जाचा व्याजदर

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना ०.१७ टक्के प्रक्रिया शुल्कासह वार्षिक ८.४० टक्के दराने गृहकर्ज देते आहे. बँकेकडून फेस्टिव्हल ऑफर अंतर्गत गृहकर्ज दिले जात आहे. ज्याचा लाभ ग्राहकांना ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मिळणार आहे. ऑफर अंतर्गत ग्राहकांना गृहकर्जावर ०.६५ टक्के म्हणजेच ६५ बेस पॉइंट्सची सूट मिळेल.

6. UPI ID होईल बंद

जर तुम्ही मागच्या वर्षभरात UPI ID वापरला नसेल. तर तुमचा UPI आयडी बंद होईल. याची माहिती युजर्सना मेल आणि एसएमएसद्वारे देण्यात आली आहे.

7. म्युच्युअल फंड आणि डिमॅट खाते

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमचे डिमॅट खाते बंद होईल. त्यासाठी नॉमिनीचे नाव समाविष्ट करा. नॉमिनीसाठी व्यक्तीचे नाव डिमॅट खात्याशी जोडणे अनिवार्य आहे. हे काम ३१ डिसेंबर पूर्वी पूर्ण करणे देखील महत्त्वाचे आहे. अन्यथा आर्थिक संकटांना सामोरे जावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT