16th installment of PM Kisan Yojana not received in bank account? Find out what is the reason Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: PM किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचे पैसे बँक खात्यात आले नाही? जाणून घ्या काय आहे कारण

Pm Kisan Yojana 16th Installment: तुमच्याही खात्यात PM किसान योजनेच्या 16 व्या हप्ताचे पैसे आलेले नाही. तर यामागचं नेमकं कारण काय आहे? तुमच्या खात्यात पैसे का आले नाही, जाणून घ्या या मागचे कारण...

साम टिव्ही ब्युरो

16th installment of PM Kisan Yojana not received in bank account? Find out what is the reason:

तुम्ही जर शेतकरी असाल, तर तुम्हीही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजेनचा लाभ घेऊ शकता. केंद्र सरकार ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी चालवते. यातच आता सरकारने या योजनेच्या 16 व्या हप्ताचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 9 कोटी पात्र शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ मिळाला आहे.

मात्र यात अनेक शेतकरी असेही आहेत, ज्यांच्या खात्यात 16 व्या हप्ताचे पैसे आलेले नाही. यातच जर तुम्हीही असाल, तर 16 व्या हप्ताचे पैसे तुमच्या बँक खात्यात का नाही आले, हे जाणून घ्या...  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बँक खात्यात पैसे न आल्याचे हे असू शकतात कारण:

पहिलं कारण

जर तुमच्या बँक खात्यात हप्त्याचे पैसे आले नाहीत, तर भू-सत्यापन न करणे हे त्यामागचे एक कारण असू शकते. या योजनेशी निगडित प्रत्येक शेतकऱ्याने हे काम करून घेणे आवश्यक असल्याचे सरकारकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. (Latest Marathi News)

दुसरं कारण

तुम्ही ई-केवायसी केले नसले तरीही तुमचा हप्ता अडकू शकतो. नियमानुसार योजनेशी संबंधित शेतकऱ्यांना हे काम करून घेणे बंधनकारक आहे. अशातच जर तुम्ही हे काम केलं नसेल, तर तुम्ही हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकता.

तिसरं कारण

हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी आधार लिंकिंग करणे देखील आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यांनाही हप्त्यांच्या लाभापासून वंचित राहावं लागलं आहे. जर तुमचा हप्ता अडकला असेल तर हे त्यामागचे एक कारण असू शकते.

चौथं कारण

तुमच्या अर्जामध्ये नाव, लिंग, आधार क्रमांक यासारखी काही चूक असल्यास किंवा बँक खात्याची माहिती चुकीची असल्यास, तुमचा हप्त्याचे पैसे अडकू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT