Long Weekend 2025 Saam Tv
बिझनेस

Long Weekend 2025: बॅग भरो, निकल पडो! २०२५ मध्ये १-२ नव्हे तर तब्बल १० लाँग वीकेंड; आतापासूच करा सुट्ट्यांचं प्लानिंग

Long Weekend In 2025 List: २०२५ मध्ये खूप सुट्ट्या मिळणार आहे. २०२५ मध्ये १-२ नव्हे तर तब्बल १० लाँग वीकेंड आहेत. त्यामुळे तुम्ही आतापासूनच सुट्ट्यांचं प्लानिंग करायला लागा.

Siddhi Hande

नवीन वर्ष सुरु झाले आहे. २०२५ सुरु झाले असून अनेक लोक लाँग वीकेंडची वाट पाहतात. लाँग वीकेंडला सुट्ट्यांचं प्लानिंग करता यावे, यासाठी अनेकजण आधीच तारीख ठरवतात. २०२५ मध्ये अनेक लाँग वीकेंड आहेत. कधीकधी ४-५ दिवस सलग सुट्ट्या आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच बाहेरगावी जायचे प्लानिंग करु शकतात. आज आम्ही तुम्हाला वर्षभरातील लाँग वीकेंडची माहिती देणार आहोत. (Long Weekend In 2025)

जानेवारी

जानेवारी महिन्यात तुम्हाला सलग ५-६ दिवस सुट्ट्या मिळू शकतात. ११ जानेवारीला शनिवार तर १२ तारखेला रविवार आहे. त्यामुळे त्या दोन दिवस सुट्ट्या मिळणार आहे. १३ जानेवारीला लोहरी आणि १४ जानेवारीला मकरसंक्रांतीची सुट्टी तुम्हाला असेल. त्यामुळे तुम्ही या काळात फिरायला जाण्याचा प्लान करु शकतात.

फेब्रुवारी

फेब्रुवारी महिन्यात १४ तारखेला व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेट करतात. त्यादिवशी शुक्रवार आहे. त्यानंतर दोन दिवस वीकेंड असणार आहे. त्यामुळे हा ३ दिवसांचा वीकेंड फिरण्यासाठी चांगला आहे.

मार्च

मार्च महिन्यात जर तुम्ही १३ तारखेला होळी दहनाच्या दिवशी सुट्टी घेतली त्यानंतर लगेचच १४ तारखेला तुम्हाला होळीची सुट्टी मिळेल. त्यामुळे हे दोन दिवस सुट्ट्या असणार आहेत. त्यानंतर १५-१६ तारखेला शनिवार-रविवार असणार आहे.

एप्रिल

एप्रिल महिन्यात १० तारखेला महावीर जयंती आहे. तुम्हाला फक्त ११ तारखेला सुट्टी घ्यायची आहे. त्यानंतर परत वीकेंडच्या २ दिवस सुट्ट्या मिळणार आहेत.

मे

मे महिन्यात १२ तारखेला सोमवारी बुद्ध पोर्मिमा आहे. त्यामुळे शनिवार रविवार आणि सोमवार हा तुमचा लाँग वीकेंड होणार आहे.

ऑगस्ट

ऑगस्ट महिन्याता स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिन शुक्रवारी आहे. त्यामुळे तुम्ही स्वातंत्र्यन दिन साजरा करुन पुढे दोन दिवस वीकेंड एन्जॉय करु शकतात.

सप्टेंबर

सप्टेंबर महिन्यात ५ तारखेला ओनम आहे. त्यानंतर ६ आणि ७ तारखेला शनिवार रविवार वीकेंड आहे.

ऑक्टोबर

ऑक्टोबर महिन्यात १ तारखेला दसरा आहे. त्यानंतर २ तारखेला गांधी जयंती आहे. तुम्ही जर फक्त शुक्रवारी सुट्टी घेतली तर तुम्हाला पुढे वीकेंड एन्जॉय करायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला ४-५ दिवस सुट्ट्या मिळतील. दिवाळी ही सोमवारी २० तारखेला आहे. त्यामुळे त्याआधीचा वीकेंड आणि त्यानंतर भाऊबीजेची सुट्टी असा प्लान तुम्ही करु शकतात.

डिसेंबर

डिसेंबर महिन्यात २५ तारखेला गुरुवार आहे. त्यादिवशी ख्रिसमसची सुट्टी असणार आहे. त्यानंतर फक्त शुक्रवारी सुट्टी घेतल्यावर तुम्हाला पुढे वीकेंड मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT