Union Budget 2024 Live Updates: Saamtv
Union Budget 2025 Highlights

Union Budget 2024: भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढतेय, महागाई पूर्णत: नियंत्रणात; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

Union Budget 2024 Live Updates: नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या बजेटमधून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

Gangappa Pujari

दिल्ली, ता. २३ जुलै २०२४

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण आज देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या बजेटमधून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. बजेट सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्पातील आश्वासनांचा उल्लेख करत देशाचे बजेट स्थिर असल्याचे म्हटले.

काय म्हणाल्या अर्थमंत्री?

"मोदी सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आले आहे. भारतात चलनवाढीचा दर सातत्याने कमी होत आहे. हा अर्थसंकल्प गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यावर केंद्रित आहे. असे म्हणत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर होणाऱ्या बजेटवर तसेच देशाच्या आर्थिक स्थितीबाबत महत्वाचे विधान केले.

"भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. भारतात महागाई नियंत्रणात आहे. हा अर्थसंकल्प गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यावर केंद्रित आहे.अर्थसंकल्पात रोजगार आणि कौशल्यावर भर देण्यात आला आहे. अर्थसंकल्पात तरुणांसाठी 2 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे," असं अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या.

विकसित भारताचा रोडमॅप

तसेच "हा अर्थसंकल्प सर्वांच्या विकासाचा आहे. हा विकसित भारताचा रोडमॅप आहे. यामध्ये ऊर्जा सुरक्षेवर सरकारने लक्ष दिले आहे. रोजगार वाढवण्यावर सरकारचा भर असून रोजगार वाढवणे ही सरकारची प्राथमिकता आहे. त्यासोबतच कृषी क्षेत्राच्या विकासाला प्रथम प्राधान्य देणार असून नैसर्गिक शेती वाढवण्यावर भर असेल 32 पिकांसाठी 109 जाती लाँच करणार आहे," अशा मोठ्या घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matar Usal Recipe : थंडीच्या दिवसांत बनवा गरमागरम 'मटार उसळ', एकदा खाल तर खातच राहाल

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

SCROLL FOR NEXT