PM Modi on Budget 2025  SaamTV
Union Budget 2025 Highlights

Union Budget 2025: आजचा बजेट जनता-जनार्दनाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे; वाचा सविस्तर

Prime Minister Narendra Modi on Union Budget 2025: आजचा बजेट सर्व भारतीयांचा स्वप्न पूर्ण करणारा आहे. आजचा बजेट जनता-जनार्दनाचा बजेट आहे. आजच्या देशाच्या प्रगतीला बळ देणारा बजेट आहे. बजेटमुळे सर्वसामान्यांची बचत होईल, उपत्न वाढेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केलं. मध्यम वर्गाने या निर्णयाचे स्वागत केलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अर्थसंकल्पाचं भरभरून कौतुक केलं असून अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचंही अभिनंदन केलं आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले, "आजचा बजेट सर्व भारतीयांचा स्वप्न पूर्ण करणारा आहे. आजचा बजेट जनता-जनार्दनाचा बजेट आहे. आजचा बजेट हा देशाच्या प्रगतीला बळ देणारा बजेट आहे. बजेटमुळे सर्वसामान्यांची बचत होईल, उपत्न वाढेल. या बजेटमुळे आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेला बळ मिळेल तसेच नव्या नोकरदार वर्गाला कररचनेचा फायदा देखील होणार आहे", असं पंतप्रधान यांनी यावेळी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे:-

इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष देऊन ट्यूरिझमवर भर दिला जाईल

आजच्या बजेटमध्ये रोजगारमधील सर्वत क्षेत्रामध्ये प्राधान्य देण्यात आलं आहे

आजचा बजेट सर्व भारतीयांचा स्वप्न पूर्ण करणारा आहे

आजचा बजेट जनता-जनार्दनाचा बजेट आहे

आजच्या बजेटमुळे सर्वसामान्यांचा चांगला फायदा होणार आहे

आजच्या बजेटमुळे आत्मनिर्भरच्या मोहिमेला बळ मिळेल

नव्या नोकरदार वर्गाला कररचनेचा फायदा होईल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: दुकानात मिळणारे अ‍ॅलोव्हेरा जेल चेहऱ्यावर लावणे होतील 'हे' नुकसान; आजपासूनच घ्या काळजी

CBSE दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, दहावीची परीक्षा दोनदा होणार

Maharashtra Live News Update: कोरेगाव भीमामध्ये बसला आग, प्रवाशांंची धावाधाव

Accident News: भयंकर अपघात! दुचाकी समोरासमोर धडकल्या, पती-पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू

Earrings Designs: साडीपासून ते लेहेंग्यापर्यंत...; या कानातल्यांच्या डिझाईन्स आहेत कोणत्याही आऊटफिटसाठी परफेक्ट चॉइस

SCROLL FOR NEXT