Samsung Galaxy A05 Saam Tv
Budget

50MP कॅमेरा, पॉवरफुल बॅटरी; Samsung चा 'हा' जबरदस्त फोन फक्त 7399 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी

Saam Tv

जर तुम्ही कमी किंमतीत सॅमसंग फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Flipkart च्या डीलमध्ये Samsung Galaxy A सीरीज बजेट स्मार्टफोन - Galaxy A05 मोठ्या डिस्काउंटसह खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 8399 रुपये आहे. बँक ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत 1,000 रुपयांनी कमी करू शकता.

या डिस्काउंटसह फोन फक्त 7399 रुपयांमध्ये तुमचा होऊ शकतो. Flipkart Axis Bank कार्डद्वारे तुम्ही हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक देखील मिळेल. तसेच या फोनची EMI 296 रुपयांपासून सुरू होते.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनी या फोनमध्ये 720x1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा HD+ डिस्प्ले देत आहे. फोनचा हा प्रकार 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज पर्यायामध्ये येतो. प्रोसेसर म्हणून कंपनी फोनमध्ये MediaTek Helio G85 चिपसेट देत आहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50-मेगापिक्सेलच्या मेन लेन्ससह 2-मेगापिक्सेलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे. सॅमसंग या फोनमध्ये 8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देत आहे.

हा फोन 1 TB पर्यंत मायक्रो SD कार्डला सपोर्ट करतो आणि यात 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 25 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 13 वर आधारित OneUI वर काम करतो. कंपनी चार वर्षांसाठी या फोनला सेफ्टी अपडेट आणि दोन जनरेशन ओएस अपग्रेड देईल. कनेक्टिव्हिटीसाठी फोन 4G, WiFi, Bluetooth, GPS, 3.5mm जॅक आणि USB Type-C पोर्ट सारखे पर्याय देत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT